पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि
(दि.६ मार्च २०२६)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी व्यक्त केली अपेक्षा
कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे जलधारा जिल्हा कृषी महोत्सव चे उद्घाटन
समाजातील एखादा माणूस किती मोठा आहे हे जर ठरवायचे असेल तर स्वतः ला मिळालेली ज्ञानाची शिदोरी जो वाटण्यात धन्यता मानतो ती व्यक्ती समाजाच्या हृदयात बसते. त्याप्रमाणे शासनाने पुरस्कार देऊन दखल घेतलेल्या शेतकऱ्यांनी किमान दहा शेतकरी आपल्या बरोबरीचे करावेत अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणि यांनी कृषी तंत्र विद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषीधारा जिल्हास्तरीय कृषी महोत्सव च्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केली. दिनांक ०६ व ०७ मार्च २०२६ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन कृषी तंत्र महाविद्यालय परिसर, पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेले आहे.
यावेळी बोलताना मा.डॉ.इन्द्र मणि म्हणाले की, देशात एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून काही शेतकरी अधिक उत्पादन घेतात तर दुसरीकडे मात्र इतर शेतकरी अपेक्षित उत्पादनापासून दूर आहेत. अशा वेळी सर्व शेतकरी एका रेषेत येण्यासाठी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेती तंत्रज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांचा उत्पादन वाढीसाठी करावा. ते म्हणाले की, मला आता शेतकऱ्याचा कुलगुरू म्हणतात हे माझ्यासाठी नक्कीच भूषणावह आहे. शेतकरी हे समाजातील एक आदर्श घटक आहे. ते शेतीत खूप चांगले आणि अखंडित कार्य करतात पण त्याची नोंद ठेवत नाहीत. त्यामुळे पुरस्कार मिळण्यासाठी तर पेपर लागतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी येथून पुढे आपली वैयक्तिक नस्ती तयार करण्यासाठी ही लक्ष दिले पाहिजे.
या वेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मा.श्री.सुनील वानखेडे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री.प्रकाश देशमुख, एनएआरपी येथील सहयोगी संचालक संशोधन मा.डॉ.सूर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्र चे प्रभारी अधिकारी मा.डॉ.संजय पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समनव्यक मा.डॉ.दीप्ती पाटगावकर, प्रकल्प संचालक आत्मा मा.श्रीमती. धनश्री जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी मा.श्रीमती.अश्विनी पठारे , कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.दत्तात्रय मुळे, कृषी उपसंचालक मा.श्री.दीपक गवळी आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.प्रकाश देशमुख म्हणाले कि, केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही पिकाच्या बाबतीत क्षेत्र वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे यात भरडधान्य, कडधान्य, गळीतधान्य आदी पिकाचे महत्व शेतकऱ्यांना परत एकदा लक्षात आणून देणे गरजेचे आहे.
विभागीय कृषी सहसंचालक मा.श्री. सुनिल वानखेडे म्हणाले की, शेतकरी उत्पादन चांगले घेतात पण विक्री व्यवस्थेत त्यांना अडचणी आहेत. अशा वेळी अशा माध्यमातून काही शेतीमाल विक्री करण्याची संधी असते शिवाय थेट विक्रीतून दोन पैसे अधिकचे मिळतात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मा.श्री.संजीव साठे यांनी केले तर आभार मा.श्रीमती.अश्विनी पठारे यांनी मानले यावेळी प्रगतशील शेतकरी मा.श्री पांडुरंग इनामे , मा.श्री.दादासाहेब शिंदे, मा.श्री.यज्ञेश कातबने, मा.श्री.लक्ष्मण आहेर, मा.श्री.बाबासाहेब पडूळ यांच्यासह कृषी विभाग, कृषि विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, कृषी तंत्र विद्यालय चे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी, शेतकरी महिला यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment