Wednesday, February 18, 2026

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करावा - मा.डॉ.इन्द्र मणि

                             


पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करावा - मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे थेट प्रक्षेत्रावर जाऊन माननीय कुलगुरूंनी केले अभिनंदन

            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिंदोन येथील शेतकरी मा.श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांना नुकताच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली चा मानाचा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) हा पुरस्कार घोषित झाला आहे. याप्रसंगी मा.श्री.शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणीचे सन्मानीय कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणि यांनी त्यांच्या प्रक्षेत्राला दिनांक १८.०२.२०२६ रोजी भेट दिली.

            यावेळी मा.डॉ.इन्द्र मणि यांनी श्री.शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या सर्व प्रक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रक्षेत्रावर घेण्यात येत असलेल्या गुलाब शेतीला भेट दिली. यासोबत जीप्सोलीना, स्नॅपड्रॅगन या नाविन्यपूर्ण पिकाच्या फुलशेतीला भेट देऊन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी मा.डॉ.इन्द्र मणि म्हणाले कि, हा फार मानाचा पुरस्कार असून तो मिळणे फार उल्लेखनीय असून शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारात आता आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले. शेतकरी बंधू हे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतावर करत आहेत आणि यामध्ये त्याना फार मोठ्या प्रमाणावर यश येताना दिसत आहे. अशा उल्लेखनीय शेतकऱ्यांची माहिती इतर शेतकरी बांधवांना देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येऊन या विविध तंत्रज्ञानाचा प्रसार इतर शेतकरी बांधवांमध्ये करणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी बांधवा सोबत माननीय कुलगुरू महोदयांनी सविस्तर चर्चा केली.

            यावेळी माननीय कुलगुरू यांच्यासोबतच महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे चे माजी महासंचालक मा.श्री.रावसाहेब भागडे, वनामकृविपरभणीचे सन्माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर चे सहयोगी संचालक संशोधन मा.श्री.सुर्यकांत पवार, एमजीएम परिसर चे संचालक मा.श्री.धापके, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर च्या प्रभारी कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर यांची उपस्थिती होती.

            वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणीचे सन्मानीय कुलगुरू, सन्माननीय संचालक विस्तार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्रपैठण रोडछत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांचा पुरस्कार अर्ज भा.कृ.अनु.प-भारतीय कृषि संशोधन केंद्रनवी दिल्ली येथे सादर करण्यात आला होता. पूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून एक याप्रमाणे शेतकऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. महाराष्ट्रातून यावर्षी च्या पुरस्कारासाठी मा.श्री.दादासाहेब शिंदे यांची निवड झालेली आहे.

मा.श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे हे वनामकृविपरभणी अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रपैठण रोडछत्रपती संभाजीनगर चे संपर्क शेतकरी असून फुलशेतीफळबाग लागवडजैविक निविष्ठा निर्मितीयांत्रिकीकरणाचा शेतीमध्ये प्रभावी वापरसुधारीत आणि शिफारशीत तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंबजिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण फुलपिकाची लागवडपॉलिहाऊस मधील फुलशेतीशेतीमधील मृदा व जलसंधारण यासाठी उत्कृष्ट नियोजन यासोबतच समाजातील विद्यार्थी आणि इतर घटकांना वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रमातून मदत करून सामाजिक बांधिलकी जपणेकृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी केव्हीके तसेच जिल्ह्यातील विविध विभागासोबत नियमितपणे कार्यइतर शेतकरी बांधवाना नवीन तंत्रज्ञान अवलंब करण्यास मदत करणेइत्यादी विविध कार्याची दखल भा.कृ.अनु.प-भारतीय कृषी संशोधन केंद्रनवी दिल्ली यांनी घेतली आणि त्यांना या सर्व उल्लेखनीय कार्यासाठी २०२६ चा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक २५-२७ फेब्रुवारी२०२६ रोजी पुसानवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पुसा कृषि विज्ञान मेला या दरम्यान देशभरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.










****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

Saturday, February 14, 2026

आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर पुरस्कार - २०२६ श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांना घोषित

आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) पुरस्कार - २०२६ हा श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांना घोषित

भारताची कृषि क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि विस्तार यासाठी कार्यरत असलेली सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद च्या भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली यांच्याद्वारे देण्यात येणारा २०२६ वर्षासाठीचा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सिंदोन या गावाचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांना दि.१३.०२.२०२६ रोजी घोषित झाला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे सन्मानीय कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणि, भा.कृ.अनु.प-अटारी, पुणे चे सन्मानीय संचालक मा.डॉ.एस.के.रॉय आणि वनामकृवि, परभणीचे सन्माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांचा पुरस्कार अर्ज भा.कृ.अनु.प-भारतीय कृषि संशोधन केंद्र, नवी दिल्ली येथे सादर करण्यात आला होता. 

मा.श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे हे वनामकृवि, परभणी अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर चे संपर्क शेतकरी असून फुलशेती, फळबाग लागवड, जैविक निविष्ठा निर्मिती, यांत्रिकीकरणाचा शेतीमध्ये प्रभावी वापर, सुधारीत आणि शिफारशीत तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब, जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण फुलपिकाची लागवड, पॉलिहाऊस मधील फुलशेती, शेतीमधील मृदा व जलसंधारण यासाठी उत्कृष्ट नियोजन यासोबतच समाजातील विद्यार्थी आणि इतर घटकांना वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रमातून मदत करून सामाजिक बांधिलकी जपणे, कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी केव्हीके तसेच जिल्ह्यातील विविध विभागासोबत नियमितपणे कार्य, इतर शेतकरी बांधवाना नवीन तंत्रज्ञान अवलंब करण्यास मदत करणे, इत्यादी विविध कार्याची दखल भा.कृ.अनु.प-भारतीय कृषी संशोधन केंद्र, नवी दिल्ली यांनी घेतली आणि त्यांना या सर्व उल्लेखनीय कार्यासाठी २०२६ चा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक २५-२७ फेब्रुवारी, २०२६ रोजी पुसा, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पुसा कृषि विज्ञान मेला या दरम्यान देशभरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे सन्मानीय कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणि यांनी श्री.शिंदे यांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. हा फार मानाचा पुरस्कार असून तो मिळणे फार उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले आणि शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारात आता आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यावेळी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर च्या सर्व टीम चे देखील अभिनंदन केले. 

यावेळी मा.श्री.दादासाहेब शिंदे म्हणाले कि, हा पुरस्कार प्राप्त होणे म्हणजे खूप अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार हा माझ्या शेतीतील केलेल्या कामाचा गौरव असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तसेच यापुढे शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी आणखी उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली असून यापुढेही आणखी चांगल्या प्रकारे शेतकरी कल्याणासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच हा पुरस्कार मिळण्यामध्ये माझे सर्व कुटुंब, माझे शेतीतील सहकारी, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग तसेच शेतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भा.कृ.अनु.प-अटारी, पुणे चे सन्मानीय संचालक मा.डॉ.एस.के.रॉय आणि वनामकृवि, परभणीचे सन्माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, जिल्ह्याचे सन्माननीय विभागीय कृषि सहसंचालक मा.श्री. सुनील वानखेडे, जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.श्री.प्रकाश देशमुख, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर चे सहयोगी संचालक संशोधन मा.डॉ.सूर्यकांत पवार, केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर-१ च्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.दिप्ती पाटगावकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी मा.श्री.दादासाहेब शिंदे यांचे अभिनंदन केले आणि शेतीतील त्यांच्या यापुढील भरीव योगदानासाठी शुभेच्छा दिल्या.

मा.श्री.शिंदे यांना यापूर्वी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत देण्यात येणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार-२०२१, भा.कृ.अनु.प-आयएआरआय, नवी दिल्ली आणि कृषि जागरण समूह, नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणारा मिलेनियर फार्मर ऑफ डिस्ट्रिक्ट-२०२५ यासारख्या अनेक उल्लेखनीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...