Thursday, December 25, 2025

मौजे घोसला ता. सोयगाव येथे सुधारीत कापुस लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


मौजे घोसला ता. सोयगाव येथे सुधारीत कापुस लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

भा. कृ. अनु. प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी मा. श्री रविंद्र पाटील. विशेष उपस्थित वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, नोडल अधिकारी डॉ. दिप्ती पाटगावकर, मा. श्री चंद्रकांत पाटील  मा.सभापती, प्रकल्पाचे उप-अन्वेषक विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ.बस्वराज पिसुरे,  विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) डॉ.संजुला भावर, मंडळ कृषि अधिकारी श्री. पी. आर. सपकाळ, उप कृषि अधिकारी श्री पी.आर. पाटील, स.कृ.अ. एल. टी. साळवे प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री. सतिष कदम, श्री. जयदेवसिंग सिंगल  या सर्वांचा उपस्थितीत दि २४-१२-२०२५ रोजी मौजे घोसला ता सोयगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री समाधान पाटील यांच्या कापूस प्रक्षेत्रावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये श्री दिप्ती पाटगावकर यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञाना विषयी सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढीकरिता योग्य अंतर, गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्त्पादनात वाढ होईल, शेतकऱ्यांनी पुढील वर्षी कमी अंतराचा व सघन लागवड तंत्रज्ञानानुसार लागवड करून कापसांचे उत्पन्न वाढवावे. येणाऱ्यां काळात नैसर्गिक शेती बद्दलचे महत्त्व याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

डॉ.बस्वराज पिसुरे यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे, कपाशीतील किडी व रोगांचे व्यवस्थापन, पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे लावावेत तसेच पराटीची कुट्टी करावी, त्यामुळे शेतात २-३ टन येवढा खत तयार होतो, व सेंद्रिय कर्ब वाढतो असे ते म्हणाले.शेतात होणारा हूमणी अळीचा प्रादुर्भाव यासाठी काय उपाययोजना कराव्यात या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. माती परीक्षण करून घेऊनचं पिकांचे नियोजन करावे. प्रकल्पाचे उद्देश शेतकऱ्यांना समजावुन सांगितले. 

डॉ.संजुला भावर यांनी सध्या परिस्थितीच्यां फळ पिकाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केळी, आंबा, पेरू या फळबागेत काय उपाययोजना कराव्यात, या बद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. महाराष्ट्र कृषिभुषण श्री रविंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना कमी खर्चाची पिके घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुर, सोयाबीन, पेरू अशा अनेक पिकांची माहिती दिली व शेतकऱ्यांनी कमी खर्च करून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यांचा बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

श्री. पाटील यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेची व कृषि विस्तार ॲप बद्दल माहीती दिली. तसेच सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान प्रगतिशील शेतकरी श्री. समाधान पाटील या तंत्रज्ञानामुळे कसा फायदा झाला याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री. सतिष कदम आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सतिष कदम, श्री जयदेव सिंगल, श्री. समाधान पाटील, श्री. निवृत्ती पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते..

****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

Tuesday, December 23, 2025

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे राष्ट्रीय किसान दिवस कार्यक्रम संपन्न


केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे राष्ट्रीय किसान दिवस कार्यक्रम संपन्न

            वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २३.१२.२०२५ रोजी राष्ट्रीय किसान दिवस आणि विकसित भारत जी राम जी कायदा-२०२५ जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर चे सहयोगी प्राध्यापक डॉ.दिलीप हिंगोले, सावित्रीबाई फुले समाज एकात्म मंडळ छत्रपती संभाजीनगर चे श्री.कैलास राठोड, तसेच सत्कारमूर्ती श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे, श्रीमती.सुनंदाताई क्षिरसागर, श्रीमती.छायाताई साबदे, श्री.ओमकार निचित यांची तसेच केव्हीके चे विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे श्री.अशोक निर्वळ यांची उपस्थिती होती.

            यावेळी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री.शिवराज सिंह चौहान यांनी देशाला संबोधून केलेल्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा.डॉ.दिलीप हिंगोले यांनी जैविक निविष्ठा यांची ओळख, महत्व आणि त्यांचा वापर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री. श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे, श्रीमती.सुनंदाताई क्षिरसागर, श्रीमती.छायाताई साबदे, श्री.ओमकार निचित यांनी त्यांची यशोगाथा सर्वांसमोर सांगितली आणि शेतीला उद्योग म्हणून पाहावे आणि त्यानुसार नियोजन करावे असे सांगतिले. यावेळी श्री. कैलास राठोड, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर यांनीही विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

            यावेळी मा.श्री.शिवराज सिंह चौहान मार्गदर्शन करताना म्हणाले कि, विकसित भारताच्या दिशेने शेती सुधारणा आणि रोजगार हमी यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत जी राम जी विधेयक-२०२५ योजना नव्याने लागू करण्यात आले आहे. यामध्ये पूर्वीच्या मनरेगा कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये १२५ दिवसांची रोजगार हमी देण्यात आलेली आहे. पिक हंगामात रोजगार हमी योजनेसाठी ६० दिवसांचा विराम कालावधी देण्यात आलेला आहे. यावेळी त्यांनी कृषी, पशुधन व ग्रामीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि या सर्व माहितीचा प्रसार जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत करावा असे सांगितले.

            यावेळी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ मार्फत उपस्थित शेतकरी बांधव यांचा सत्कार करण्यात आला तसेच केव्हीके मार्फत भरडधान्याचे मूल्यवर्धन आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग या विषयांवर घेण्यात आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे केले यांनी तर आभार डॉ.अनिता जिंतूरकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केव्हीकेतील कर्मचारी श्री.सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.विशाल दाभाडे, श्री.जयदीप बनसोडे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.























































****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...