केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे राष्ट्रीय किसान दिवस कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २३.१२.२०२५ रोजी राष्ट्रीय किसान दिवस आणि विकसित भारत जी राम जी कायदा-२०२५ जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर चे सहयोगी प्राध्यापक डॉ.दिलीप हिंगोले, सावित्रीबाई फुले समाज एकात्म मंडळ छत्रपती संभाजीनगर चे श्री.कैलास राठोड, तसेच सत्कारमूर्ती श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे, श्रीमती.सुनंदाताई क्षिरसागर, श्रीमती.छायाताई साबदे, श्री.ओमकार निचित यांची तसेच केव्हीके चे विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे श्री.अशोक निर्वळ यांची उपस्थिती होती.
यावेळी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री.शिवराज सिंह चौहान यांनी देशाला संबोधून केलेल्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा.डॉ.दिलीप हिंगोले यांनी जैविक निविष्ठा यांची ओळख, महत्व आणि त्यांचा वापर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री. श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे, श्रीमती.सुनंदाताई क्षिरसागर, श्रीमती.छायाताई साबदे, श्री.ओमकार निचित यांनी त्यांची यशोगाथा सर्वांसमोर सांगितली आणि शेतीला उद्योग म्हणून पाहावे आणि त्यानुसार नियोजन करावे असे सांगतिले. यावेळी श्री. कैलास राठोड, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर यांनीही विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मा.श्री.शिवराज सिंह चौहान मार्गदर्शन करताना म्हणाले कि, विकसित भारताच्या दिशेने शेती सुधारणा आणि रोजगार हमी यासाठी केंद्र शासनामार्फत विकसित भारत जी राम जी विधेयक-२०२५ योजना नव्याने लागू करण्यात आले आहे. यामध्ये पूर्वीच्या मनरेगा कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये १२५ दिवसांची रोजगार हमी देण्यात आलेली आहे. पिक हंगामात रोजगार हमी योजनेसाठी ६० दिवसांचा विराम कालावधी देण्यात आलेला आहे. यावेळी त्यांनी कृषी, पशुधन व ग्रामीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि या सर्व माहितीचा प्रसार जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत करावा असे सांगितले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ मार्फत उपस्थित शेतकरी बांधव यांचा सत्कार करण्यात आला तसेच केव्हीके मार्फत भरडधान्याचे मूल्यवर्धन आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग या विषयांवर घेण्यात आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)







.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)



.jpeg)










.jpeg)



.jpeg)


.jpeg)


No comments:
Post a Comment