मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०९ एप्रिल, २०२६ रोजी मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा, अध्यक्ष, वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरण (PPVFRA), कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, माजी सचिव, कृषी संशोधन व शिक्षण विभाग (DARE), महानिदेशक, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तथा माजी अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी विज्ञान प्राधिकरण (NAAS), नवी दिल्ली आणि मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी भेट दिली.
यावेळी मा.डॉ.सुर्यकांत पवार, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिपक पाटील, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी महाविद्यालय, बदनापूर, एग्रोवनचे जिल्हा वरिष्ठ पत्रकार, मा.श्री.संतोष मुंढे यांनीही केव्हीकेला भेट दिली. यावेळी केव्हीकेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर यांच्यासह केव्हीकेतील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यालयीन बैठकीमध्ये केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प, विविध निर्मिती युनिट, उपक्रम, मोहिमा, समाजमाध्यमे, केव्हीकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालील घडलेले कृषि उद्योजक तसेच कृषि विज्ञान केंद्रा मार्फत घेण्यात येणाऱ्या कार्याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
सर्व मान्यवरांनी केव्हीके मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढेही आणखी सक्रियपणे हे उपक्रम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवावेत, असे सांगितले.
No comments:
Post a Comment