Friday, November 21, 2025

केव्हीके छत्रपती संभाजीनगर-१ येथे दि.२१.११.२०२५ रोजी उत्तम कापूस उत्पादन तंत्रज्ञान एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

 



        केव्हीके छत्रपती संभाजीनगर-१ येथे उत्तम कापूस उत्पादन तंत्रज्ञान एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

       भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार (ता.२१) उत्तम कापूस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन स्व. वंसतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मा. डॉ. इन्द्र मणि, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी आभासी माध्यमाद्वारे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर कार्यशाळेचे अध्यक्ष व उद्धाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) मा. डॉ. राकेश अहिरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर मा. श्री प्रकाश देशमुख, एन.ए.आर.पी. छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन मा. डॉ.एस.बी.पवार, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, एन.ए.आर.पी छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी प्राध्यापक मा.डॉ.ज्ञानेश्वर मुटकुळे, केव्हीकेतील विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर, डॉ. बी.एल. पिसुरे, डॉ. एस.व्ही. भावर,  विशेष कापूस प्रकल्पातील तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम, श्री जयदेव सिंगल उपस्थित होते.

        यावेळी आभासी माध्यमाद्वारे मा.डॉ. इन्द मणि यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले कि, सुधारीत कापूस लागवड तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा. तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करणे आवश्यक आहे. कापूस व इतर पिकातील घन लागवड तंत्रज्ञानाबद्दल प्रसार करणे आवश्यक आहे. शेतीमधील नॅनो तंत्राबद्दल जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना माहिती देणे आवश्यक आहे. शाश्वत शेती सोबतच कर्जमुक्ती शेतीकडे वळण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांनी संयुक्तपणे आपल्याला काम करणे आवश्यक आहे. प्रगतशील शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना समन्वय व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी विविध विभागाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प बद्दल त्यांचे स्वतःचे अनुभव इतर शेतकरी बांधवांना सांगणे आवश्यक आहे. तसेच विस्तार कार्यक्रम आयोजित करत असताना केवळ व्याख्याने देणे यावर भर न देता जास्तीत जास्त शेतकरी शास्त्रज्ञ संवादावर भर द्यावा.

        मा.संचालक (विस्तार शिक्षण), वनामकृवि परभणी मा. डॉ. राकेश अहिरे, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन सांगितले कि, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापेक्षा जालना जिल्ह्याचे रुई चे उत्पादन जास्त आहे. पिक लागवडीमध्ये खताचा, औषधांचा खर्च कमी करावा असा सल्ला दिला. तसेच माती परिक्षण करणे फार गरजेचे आहे. त्यानुसार पिकांची निवड करुन उत्पादन वाढवा व खर्च कमी करा. पाणी देताना पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. खताचे, पाण्याचे व मजुरांचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे. सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानाचे उपयोग करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासोबत जोडा आणि उत्पादन वाढवावे,असे सांगितले.

        जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर मा.श्री प्रकाश देशमुख हे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, उत्तम कापूस व्यवस्थापन हा जिव्हाळ्याचा विषय पुढे राहणार आहे. कापूस या पिकांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी एक लाख हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. पुढच्या काळात स्वच्छ कापूस उत्पादनावर भर देणे गरजेचे आहे.

       मा.डॉ.सुर्यकांत पवार म्हणाले की, जिल्ह्यानुसार व तालुक्यानुसार पिक पद्धतीत बदल आहे. कमी क्षेत्रावर अधिक निव्वळ नफा असेल अशाच पिकाची लागवड करावी. एका पिकावर अवलंबून राहू नये. निव्वळ नफा मिळणाऱ्या पिकांची लागवड करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब शेतकरी बांधवांनी करणे आवश्यक आहे. तसेच पिक पध्तीत बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये तूर हे पिक सर्व शेतकऱ्यांसाठी फार उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तूर पिकाकडे शेतकरी बांधवांनी वळावे.

  कार्यक्रम समन्वयक केव्हीके छत्रपती संभाजीनगर-१ मा.डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले.  केव्हीकेच्या माध्यमातून  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विशेष कापूस प्रकल्पाची माहीती दिली व या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

   यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.मुटकुळे म्हणाले की, किड व रोग एकात्मिक व्यवस्थापन करावे. कपाशीतील सर्व किड व रोगांची ‍माहीती दिली. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. तसेच कापसाची पऱ्हाटी हि कुठेही बांधावर वगैरे न ठेवता कापूस पऱ्हाटीची कुट्टी करावी. ज्यामुळे गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होतो आणि सोबतच यामुळे सेंद्रिय घटक जमिनीला मिळतो. 

    विशेष कापूस प्रकल्पातील श्री बद्री शेळके, श्री कौतिक मिरगे व श्रीमती शकुंतला घायट यांनी प्रकल्पाबद्दल अनुभव सांगितले. यावेळी सुत्रसंचालन डॉ. बी.एल.पिसुरे यांनी केले त रकार्यक्रमाचे आभार डॉ.अनिता जिंतुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. सतिश कदम, श्री जयदेव सिंगल, श्री जयदिप बनसोडे, श्री. शिवा काजळे, श्री. विशाल दाभाडे आणि केव्हीकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी केले.



















****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

          

Wednesday, November 19, 2025

पीएम किसान सन्मान निधी २१ वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 



ग्रामीण युवकांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे-मा.श्री.प्रकाश देशमुख

केव्हीके येथे पीएम किसान सन्मान निधी २१ वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि

शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

       

       कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय कृषी महाविद्यालय, लिहाखेडी ता.सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीएम किसान सन्मान निधी २१ वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री. प्रकाश देशमुख, एनएआरपी छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन तथा कृषी महाविद्यालय, लिहाखेडी चे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य मा.डॉ.सूर्यकांत पवार व कृषी उपसंचालक मा.श्री.दीपक गवळी, कृषी उद्योजिका मा.श्रीमती.छायाताई साबदे यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर, डॉ. बस्वराज पिसुरे यांच्यासह सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

        सन्माननीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी दिनांक १९ नोव्हेंबर,२०२५ रोजी 'दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषद' चे उद्घाटन केले आणि पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता थेट ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण कार्यक्रमही यावेळी झाला. यावेळी माननीय पंतप्रधानांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला, कृषी उत्पादने पाहिली, प्रदर्शनीमध्ये शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचे दर्शन घेतले आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी देशाला संबोधित करताना मा.श्री.नरेंद्र मोदी म्हणाले ली, आपल्या मातीतली सुपीकता आणि पिकांची पौष्टिकता टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारणे हेच भविष्यासाठी योग्य आणि आवश्यक आहे. यावेळी ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹१८,००० कोटी निधी पीएम किसान योजनेद्वारे जमा केला गेला. शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात, ग्रामीण उद्योजकांना आणि जैविक उत्पादनकर्त्यांना प्रदर्शन व विक्रीची संधी मिळावी यासाठी नवे प्रयत्न सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी शेती आणि जैविक उत्पादन क्षेत्रात महिला आणि तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष सत्रांचे आयोजन आणि आर्थिक मदतीची हमी देण्यात आली.

    अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा.डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या कि, पीएम किसान सम्मान निधी मार्फत मिळणाऱ्या निधीचा शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांसाठी उपयोग करावा. यावेळी त्या म्हणाल्या कि, केव्हीके मार्फत शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ शेतकरी बांधवांनी नक्की घ्यावा. 

    यावेळी मार्गदर्शन करताना मा.श्री. प्रकाश देशमुख म्हणाले की, शेतकरी, महिला शेतकरी आणि विशेष करून ग्रामीण युवकांनी शेती सोबतच शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाकडे वळावे.यासाठी शासना मार्फत मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिले जाते. यापैकीच एक असेलली पीएमएफएमई ही योजना फार उपयुक्त अशी योजना असून ग्रामीण भागातील युवकांनी तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कृषी पूरक उद्योग उभारणीकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थींना ३५ टक्के पर्यंतची सबसिडी देण्यात येते. ज्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी करू शकतात. तसेच या योजनेअंतर्गत प्रकल्प निवड, प्रकल्प प्रस्ताव बनवणे, सर्व तांत्रिक माहिती यासोबतच सर्व दस्तावेज निर्मिती आणि प्रकल्प अहवाल सादर करणे इत्यादी सर्व कामे ही जिल्हास्तरावर नेमून दिलेले संसाधन व्यक्तिमार्फत केली जातात. त्यामुळे शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प प्रस्ताव सादर करणे सोपे झालेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी विविध कृषी पूरक उद्योगाचा उभारणी करावी. देशामध्ये या योजने अंतर्गत विविध प्रक्रिया उद्योग उभारणीमध्ये देशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि यापुढेही तो अग्रेसर राहावा याकरिता शेतकऱ्यांनी पुढे येऊन उद्योग उभारणीकडे वळावे.

     यावेळी मार्गदर्शन करताना मा.श्री. दीपक गवळी म्हणाले की, महाराष्ट्र शासनामार्फत महाविस्तार नावाचे मोबाईल ॲप हे शेतकरी बांधवांसाठी विकसित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ, पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आलेले असून यावर शेतकरी शेती संदर्भातील सर्व माहिती आपल्या मोबाईलवर मिळू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करावे. या ॲप मध्ये सर्व प्रमुख पिकांची लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन व इतर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच एआय तंत्रज्ञानाद्वारे आपल्या मोबाईलवर आपल्या पिकामध्ये आलेल्या अडचणी थेट विचारून त्याची उत्तर आपण मिळू शकतो. यावेळी उपस्थित सर्व शेतकरी विद्यार्थी व महिला बंधू-भगिनींनी हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतले तसेच हे ॲप कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक देखील यावेळी घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी तसेच कृषी महाविद्यालय, लिहाखेडी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हे डॉ.अनिता जिंतूरकर यांनी केले. या सोबतच त्यांनी महिलांना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग अंतर्गत असणाऱ्या विविध शेतीपूरक उद्योगाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यकमाच्या यशस्वितेसाठी श्री.सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.



















****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

           

Friday, November 14, 2025

शेकटा ता.पैठण येथे दिनांक १४.११.२०२५ रोजी कापूस प्रक्षेत्र दिन कार्यक्रम संपन्न

 




शेकटा ता.पैठण येथे कापूस प्रक्षेत्र दिन कार्यक्रम संपन्न

भा. कृ. अनु.प.केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत दि.१४-११-२०२५ मौजे शेकटा, ता.पैठण, जिछत्रपती संभाजीनगर येथे प्रगतशील शेतकरी श्री आबासाहेब भवर यांच्या शेतावर प्रक्षेत्र दिन आयोजीत करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ च्यां कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर म्हणाल्या कि, शेतीमध्ये शाश्वत उत्पादन घेण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी माती परिक्षण करावे व त्यानुसार पिक लागवडीचे नियोजन करावे. तसेच शाश्वत एकात्मिक पिक पध्दतीचा अवलंब करावा. शेतकरी बांधवांनी सुधारीत कापुस लागवडीचा अवलंब करून कापसाचे उत्पन्न वाढवावे. तसेच पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच महिला व बालकांचे तसेच कुटुंबातील सर्वं सदस्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पौष्टिक अन्न धान्यांच्या उत्पादनाकडे वळावे.  तसेच काही अडचण असल्यास कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथे संपर्क साधावा.

            कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. बस्वराज पिसुरे यांनी प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना समजावून सांगितला. सुधारीत कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेवढाचं खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये त्यांनी ३० दिवसांनी गळ फांदी काढणे व ८०-९० दिवसांनी शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून अधिक उत्पादन मिळू शकते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा असे सांगितले. कपाशी वेचणीनंतर अनेक शेतकरी फरदड घेतात तरी फरदड न घेता त्याऐवजी पन्हाटीची कुट्टी करा. त्यामुळे जमिनीला उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. परिणामी जमिनीचा पोत सुधारतो असे डॉ. पिसुरे यांनी सांगितले.

            यावेळी तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम यांनी विशेष कापूस प्रकल्पाची माहिती दिली व आभार व्यक्त केले. शेकटा येथील विशेष कापूस प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी श्री.शंकर कळसकर, श्री.विठ्ठल शेळके, श्री.राजेंद्र भवर, श्री.आबासाहेब भवर यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेतले. तसेच या सुधारित लागवड तंत्रज्ञानामळे त्यांच्या उत्पादनात  कशाप्रकारे वाढ झाली. याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानांचा अवलंब करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.  याबद्दलचे आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम श्री जयदेव सिंगल यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला, शेतकरी बांधव उपस्थित होते.







****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account






Wednesday, November 12, 2025

"माझा एक दिवस माझ्या बळीराजसोबत" कार्यक्रम संपन्न

 


"माझा एक दिवस माझ्या बळीराजसोबत" कार्यक्रम संपन्न

दिनांक: १२ नोव्हेंबर,२०२५

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे सन्मानीय कुलगुरू मा.डॉ.इंद्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि सन्माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी "माझा एक दिवस माझ्या बळीराजसोबत" हे अभियान राबविण्यात येते. यामध्ये विद्यापीठाचे मा.कुलगुरू सहित प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवसभर चर्चा करून मार्गदर्शन करतात. याचाच भाग म्हणून दिनांक १२ नोव्हेंबर, २०२५ रोजी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांच्या पुढाकारातुन पैठण तालुक्यातील मौजे म्हारोळा येथे शेतकरी भेट व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली मा.श्रीमती.कालिंदा जाधव यांनी सुरू केलेल्या कृषी प्रक्रिया उद्योग, मा.श्रीमती.अलका जाधव यांच्या प्रक्रिया युनिट, मा.श्रीमती.शीतल जाधव यांचे शेळीपालन युनिट इत्यादीला भेट देऊन त्यांच्या कार्याबद्दल चर्चा करण्यात आली.

यावेळी डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी अन्न प्रकिया उद्योग बद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध पदार्थ निर्मिती, त्याबद्दलचे योग्य प्रशिक्षण घेण्याचे महत्व आणि त्यांचे मार्केटिंग करताना घ्यावयाच्या बाबी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बंधू भगिनींना प्रक्रिया बद्दल सविस्तर प्रशिक्षण हे विनामूल्य देण्यासाठी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ सदैव उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनींनी याचा फायदा घ्यावा.

म्हारोळा फूड प्रॉडक्ट्स अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या समर्थ इन्स्टंट डाळ बट्टी आटा, राजगिरा पीठ, भगर पीठ, पौष्टिक ढोकळा आटा, साबुदाणा पीठ व इतर उत्पादनांची माहिती श्रीमती.कालिंदा जाधव यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी केव्हीकेच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या अभियानबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच दुग्ध प्रकिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन या उद्योगाबद्दल आणि त्यातील संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यासाठी शासनाच्या योजना आणि केव्हीके द्वारे घडविण्यात आलेले दुग्ध प्रकिया उद्योजक यांची सविस्तर माहिती दिली. आणि याकडे शेतकऱ्यांनी वळावे असे सांगितले.

यावेळी केव्हीकेचे विस्तार शिक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे यांनी सद्य परिस्थितीत कापूस पिकाचे व्यवस्थापन, कापूस पऱ्हाटी व्यवस्थापन आणि कुट्टीचे महत्व याबद्दल माहिती दिली. तसेच हरभरा पीक लागवड तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील महिला शेतकरी, महिला उद्योजक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच यावेळी देण्यात आलेली माहिती नक्कीच फायद्याची ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी मत व्यक्त केले व या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल सर्वांनी खूप समाधान व्यक्त केले.







****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/


मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...