शेकटा ता.पैठण येथे कापूस प्रक्षेत्र दिन कार्यक्रम संपन्न
भा. कृ. अनु.प.केंद्रीय
कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१
यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत
दि.१४-११-२०२५ मौजे शेकटा, ता.पैठण,
जिछत्रपती संभाजीनगर येथे प्रगतशील शेतकरी श्री आबासाहेब भवर यांच्या
शेतावर प्रक्षेत्र दिन आयोजीत करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१
च्यां कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर म्हणाल्या कि, शेतीमध्ये शाश्वत
उत्पादन घेण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी
माती परिक्षण करावे व त्यानुसार पिक लागवडीचे नियोजन करावे. तसेच शाश्वत व एकात्मिक पिक पध्दतीचा
अवलंब करावा. शेतकरी बांधवांनी सुधारीत
कापुस लागवडीचा अवलंब करून कापसाचे उत्पन्न वाढवावे. तसेच पिकांच्या
उत्पादन वाढीसोबतच महिला व बालकांचे तसेच कुटुंबातील सर्वं सदस्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पौष्टिक अन्न धान्यांच्या
उत्पादनाकडे वळावे. तसेच काही अडचण
असल्यास कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथे संपर्क साधावा.
कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. बस्वराज पिसुरे यांनी
प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना
समजावून सांगितला. सुधारीत कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन
केले. सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल
तेवढाचं खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये
त्यांनी ३० दिवसांनी गळ फांदी काढणे व ८०-९० दिवसांनी शेंडा खुडणे ही महत्त्वाची
कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या
अंतरावर करावी. या
पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून अधिक उत्पादन
मिळू शकते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक
सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन
पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये
निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक
बुरशीनाशकांचा वापर करावा असे सांगितले. कपाशी वेचणीनंतर अनेक शेतकरी फरदड घेतात तरी फरदड न घेता त्याऐवजी
पन्हाटीची कुट्टी करा. त्यामुळे जमिनीला उत्कृष्ट
सेंद्रिय खत मिळते. परिणामी जमिनीचा पोत सुधारतो असे डॉ. पिसुरे यांनी सांगितले.
यावेळी तांत्रिक
प्रशिक्षक श्री सतिश कदम यांनी विशेष कापूस
प्रकल्पाची माहिती दिली व आभार व्यक्त केले. शेकटा येथील
विशेष कापूस प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी श्री.शंकर कळसकर, श्री.विठ्ठल शेळके,
श्री.राजेंद्र भवर, श्री.आबासाहेब भवर यांनी कमी खर्चात अधिक
उत्पादन कसे घेतले. तसेच
या सुधारित लागवड तंत्रज्ञानामळे त्यांच्या
उत्पादनात कशाप्रकारे वाढ झाली. याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच जास्तीत
जास्त शेतकऱ्यांनी या
तंत्रज्ञानांचा अवलंब करावा असे त्यांनी यावेळी
सांगितले. याबद्दलचे आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन विशेष कापूस
प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम व श्री जयदेव सिंगल यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला, शेतकरी
बांधव उपस्थित होते.
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :







No comments:
Post a Comment