Thursday, April 9, 2026

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

 


मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीकेछत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

           वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०९ एप्रिल, २०२६ रोजी मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा, अध्यक्ष, वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरण (PPVFRA), कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, माजी सचिव, कृषी संशोधन व शिक्षण विभाग (DARE), महानिदेशक, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तथा माजी अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी विज्ञान प्राधिकरण (NAAS), नवी दिल्ली  आणि मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी भेट दिली.

            यावेळी मा.डॉ.सुर्यकांत पवार, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिपक पाटील, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी महाविद्यालय, बदनापूर, एग्रोवनचे जिल्हा वरिष्ठ पत्रकार, मा.श्री.संतोष मुंढे यांनीही केव्हीकेला भेट दिली. यावेळी केव्हीकेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर यांच्यासह केव्हीकेतील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

            याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यालयीन बैठकीमध्ये  केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प, विविध निर्मिती युनिट, उपक्रम, मोहिमा, समाजमाध्यमे, केव्हीकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालील घडलेले कृषि उद्योजक तसेच कृषि विज्ञान केंद्रा मार्फत घेण्यात येणाऱ्या कार्याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली.   

            सर्व मान्यवरांनी केव्हीके मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढेही आणखी सक्रियपणे हे उपक्रम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवावेत, असे सांगितले. 











Wednesday, April 8, 2026

जमिनीचे शोषण नको, पोषण करा - डॉ.दिप्ती पाटगावकर


जमिनीचे शोषण नको, पोषण करा - डॉ.दिप्ती पाटगावकर

मोढा बु. ता.सिल्लोड येथे खरीप पूर्ण हंगाम नियोजन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर आणि एटलास क्रॉपको इंडिया प्रा.लि. आणि सावित्रीबाई फुले समाज एकात्म मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०८ एप्रिल, २०२६ रोजी भूमी सुपोषण अभियान अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील मोढा बु. येथे खरीप पूर्व हंगाम नियोजन मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर च्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.सतीश कदम तसेच साफु च्या प्रकल्प अधिकारी श्रीमती.ज्योती शेजुळ, श्री.सागर शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या कि, शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जमिनीचे आरोग्य जपणे सर्वात महत्वाचे आहे. जमिनीचे शोषण थांबवून तिचे पोषण करणे आवश्यक आहे. तसेच अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे जमीन विषारी बनत चालली असून हे थांबवण्यासाठी विविध जैविक निविष्ठांचा वापर करून जमिनीचे सुपोषण करणे आवश्यक आहे. जमिनीचे सुदृढ असेल तरच आपणाला पाहिजे तसे आणि शाश्वत उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी विविध जैविक निविष्ठांचा वापर आपल्या शेतीमध्ये वाढवणे आवश्यक आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.संजूला भावर यांनी पाण्याच्या उपलब्धते नुसार शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रावर तरी फळबाग  लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. माती परीक्षण अहवाल नुसार फळबाग लागवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. फेब्रुवारी नंतर पाण्याची उपलब्धता कमी असेल तरी त्यानुसार कमी पाण्याची गरज असणाऱ्या फळपिकांची लागवड करणे शक्य आहे. तसेच यावेळी त्यांनी सांगितले की भाजीपाला पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.

डॉ.बस्वराज पिसुरे यांनी खरीप पिकातील बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता तपासणी तसेच जैविक निविष्ठांचा नियमित वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. तसेच कापूस पिकामध्ये घन लागवड तंत्रज्ञान, दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसेच सर्वच पिकांमध्ये एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती.ज्योती शेजुळ यांनी केले. यावेळी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, March 6, 2026

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि
(दि.६ मार्च २०२६)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ  इंद्रमणी यांनी व्यक्त केली अपेक्षा




कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे जलधारा जिल्हा कृषी महोत्सव चे उद्घाटन 

समाजातील एखादा माणूस किती मोठा आहे हे जर ठरवायचे असेल तर स्वतः ला मिळालेली ज्ञानाची शिदोरी जो वाटण्यात धन्यता मानतो ती व्यक्ती समाजाच्या हृदयात बसते. त्याप्रमाणे शासनाने पुरस्कार देऊन दखल घेतलेल्या शेतकऱ्यांनी किमान दहा शेतकरी आपल्या बरोबरीचे करावेत अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणि यांनी कृषी तंत्र विद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषीधारा जिल्हास्तरीय कृषी महोत्सव च्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केली. दिनांक ०६ व ०७ मार्च २०२६ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन कृषी तंत्र महाविद्यालय परिसर, पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेले आहे.

यावेळी बोलताना मा.डॉ.इन्द्र मणि म्हणाले की, देशात एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून काही शेतकरी अधिक उत्पादन घेतात तर दुसरीकडे मात्र इतर शेतकरी अपेक्षित उत्पादनापासून दूर आहेत. अशा वेळी सर्व शेतकरी एका रेषेत येण्यासाठी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेती तंत्रज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांचा उत्पादन वाढीसाठी करावा. ते म्हणाले की, मला आता शेतकऱ्याचा कुलगुरू म्हणतात हे माझ्यासाठी नक्कीच भूषणावह आहे.  शेतकरी हे समाजातील एक आदर्श घटक आहे. ते शेतीत खूप चांगले आणि अखंडित कार्य करतात पण त्याची नोंद ठेवत नाहीत. त्यामुळे पुरस्कार मिळण्यासाठी तर पेपर लागतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी येथून पुढे आपली वैयक्तिक नस्ती तयार करण्यासाठी ही लक्ष दिले पाहिजे.

या वेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक  मा.श्री.सुनील वानखेडे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री.प्रकाश देशमुख, एनएआरपी येथील सहयोगी संचालक संशोधन मा.डॉ.सूर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्र चे प्रभारी अधिकारी मा.डॉ.संजय पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समनव्यक मा.डॉ.दीप्ती पाटगावकर, प्रकल्प संचालक आत्मा  मा.श्रीमती. धनश्री जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी मा.श्रीमती.अश्विनी पठारे , कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.दत्तात्रय मुळे, कृषी उपसंचालक मा.श्री.दीपक गवळी आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.प्रकाश देशमुख म्हणाले कि, केंद्र सरकार आणि राज्य सरकार  काही पिकाच्या बाबतीत क्षेत्र वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे यात भरडधान्य, कडधान्य, गळीतधान्य आदी पिकाचे महत्व शेतकऱ्यांना परत एकदा लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

विभागीय कृषी सहसंचालक मा.श्री. सुनिल वानखेडे म्हणाले की, शेतकरी उत्पादन चांगले घेतात पण विक्री व्यवस्थेत त्यांना अडचणी आहेत. अशा वेळी अशा माध्यमातून काही शेतीमाल विक्री करण्याची संधी असते शिवाय थेट विक्रीतून दोन पैसे अधिकचे मिळतात.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक  मा.श्री.संजीव साठे यांनी केले तर आभार मा.श्रीमती.अश्विनी पठारे यांनी मानले यावेळी प्रगतशील शेतकरी मा.श्री पांडुरंग इनामे , मा.श्री.दादासाहेब शिंदे, मा.श्री.यज्ञेश कातबने, मा.श्री.लक्ष्मण आहेर, मा.श्री.बाबासाहेब पडूळ यांच्यासह कृषी विभाग, कृषि विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, कृषी तंत्र विद्यालय चे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी, शेतकरी महिला यांची उपस्थिती होती.

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...