केव्हीके छत्रपती संभाजीनगर-१ येथे उत्तम कापूस उत्पादन तंत्रज्ञान एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार (ता.२१) उत्तम कापूस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन स्व. वंसतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मा. डॉ. इन्द्र मणि, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी आभासी माध्यमाद्वारे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर कार्यशाळेचे अध्यक्ष व उद्धाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) मा. डॉ. राकेश अहिरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर मा. श्री प्रकाश देशमुख, एन.ए.आर.पी. छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन मा. डॉ.एस.बी.पवार, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, एन.ए.आर.पी छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी प्राध्यापक मा.डॉ.ज्ञानेश्वर मुटकुळे, केव्हीकेतील विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर, डॉ. बी.एल. पिसुरे, डॉ. एस.व्ही. भावर, विशेष कापूस प्रकल्पातील तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम, श्री जयदेव सिंगल उपस्थित होते.
यावेळी आभासी माध्यमाद्वारे मा.डॉ. इन्द मणि यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले कि, सुधारीत कापूस लागवड तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा. तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करणे आवश्यक आहे. कापूस व इतर पिकातील घन लागवड तंत्रज्ञानाबद्दल प्रसार करणे आवश्यक आहे. शेतीमधील नॅनो तंत्राबद्दल जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना माहिती देणे आवश्यक आहे. शाश्वत शेती सोबतच कर्जमुक्ती शेतीकडे वळण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांनी संयुक्तपणे आपल्याला काम करणे आवश्यक आहे. प्रगतशील शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना समन्वय व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी विविध विभागाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प बद्दल त्यांचे स्वतःचे अनुभव इतर शेतकरी बांधवांना सांगणे आवश्यक आहे. तसेच विस्तार कार्यक्रम आयोजित करत असताना केवळ व्याख्याने देणे यावर भर न देता जास्तीत जास्त शेतकरी शास्त्रज्ञ संवादावर भर द्यावा.
मा.संचालक (विस्तार शिक्षण), वनामकृवि परभणी मा. डॉ. राकेश अहिरे, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन सांगितले कि, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापेक्षा जालना जिल्ह्याचे रुई चे उत्पादन जास्त आहे. पिक लागवडीमध्ये खताचा, औषधांचा खर्च कमी करावा असा सल्ला दिला. तसेच माती परिक्षण करणे फार गरजेचे आहे. त्यानुसार पिकांची निवड करुन उत्पादन वाढवा व खर्च कमी करा. पाणी देताना पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. खताचे, पाण्याचे व मजुरांचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे. सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानाचे उपयोग करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासोबत जोडा आणि उत्पादन वाढवावे,असे सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर मा.श्री प्रकाश देशमुख हे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, उत्तम कापूस व्यवस्थापन हा जिव्हाळ्याचा विषय पुढे राहणार आहे. कापूस या पिकांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी एक लाख हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. पुढच्या काळात स्वच्छ कापूस उत्पादनावर भर देणे गरजेचे आहे.
मा.डॉ.सुर्यकांत पवार म्हणाले की, जिल्ह्यानुसार व तालुक्यानुसार पिक पद्धतीत बदल आहे. कमी क्षेत्रावर अधिक निव्वळ नफा असेल अशाच पिकाची लागवड करावी. एका पिकावर अवलंबून राहू नये. निव्वळ नफा मिळणाऱ्या पिकांची लागवड करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब शेतकरी बांधवांनी करणे आवश्यक आहे. तसेच पिक पध्तीत बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये तूर हे पिक सर्व शेतकऱ्यांसाठी फार उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तूर पिकाकडे शेतकरी बांधवांनी वळावे.
कार्यक्रम समन्वयक केव्हीके छत्रपती संभाजीनगर-१ मा.डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले. केव्हीकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विशेष कापूस प्रकल्पाची माहीती दिली व या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.मुटकुळे म्हणाले की, किड व रोग एकात्मिक व्यवस्थापन करावे. कपाशीतील सर्व किड व रोगांची माहीती दिली. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. तसेच कापसाची पऱ्हाटी हि कुठेही बांधावर वगैरे न ठेवता कापूस पऱ्हाटीची कुट्टी करावी. ज्यामुळे गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होतो आणि सोबतच यामुळे सेंद्रिय घटक जमिनीला मिळतो.
विशेष कापूस प्रकल्पातील श्री बद्री शेळके, श्री कौतिक मिरगे व श्रीमती शकुंतला घायट यांनी प्रकल्पाबद्दल अनुभव सांगितले. यावेळी सुत्रसंचालन डॉ. बी.एल.पिसुरे यांनी केले त रकार्यक्रमाचे आभार डॉ.अनिता जिंतुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. सतिश कदम, श्री जयदेव सिंगल, श्री जयदिप बनसोडे, श्री. शिवा काजळे, श्री. विशाल दाभाडे आणि केव्हीकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी केले.
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :







No comments:
Post a Comment