कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ चे कार्य उल्लेखनीय - मा.डॉ.एस.के.रॉय
संचालक, भा.कृ.अनु.प.-अटारी, पुणे यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ ला भेट
दिनांक ०४.१२.२०२५ रोजी मा. डॉ. एस. के. रॉय, संचालक, भा.कृ.अनु.प.-अटारी, पुणे आणि मा. डॉ. राकेश अहिरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली. यावेळी कृषी विज्ञान केंद्रांच्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मा.डॉ. राकेश अहिरे यांनी मा.डॉ.एस. के. रॉय यांचे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने स्वागत केले. यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प आणि उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच केव्हीकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालील कृषि उद्योजकांची माहिती दिली. तसेच यापुढील काळात कृषि विज्ञान केंद्रामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली.
यावेळी मा.डॉ.एस.के.रॉय म्हणाले कि, कृषि विज्ञान केंद्रे खूप उत्तम पद्धतीने कार्य करत आहेत. ज्यामुळे कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्यात मोठ्या प्रमाणावर यश येताना दिसत आहे. तसेच केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे असलेल्या जैविक निविष्ठा उत्पादन प्रयोगशाळा युनिट फार उल्लेखनीय असून याचा शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणात फायदा होण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणावर विविध विस्तार कार्यक्रमांचे आयोजन केव्हीके मार्फत करण्यात यावे. तसेच केव्हीके मार्फत राबविण्यात येत असलेले विविध प्रकल्प आणि उपक्रम हे उल्लेखनीय असून यापुढेही असेच कार्य करत राहावे.
मा.डॉ.राकेश अहिरे यांनी यावेळी केव्हीके मार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच कृषि विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या उल्लेखनीय विस्तार कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी नाविन्यपूर्ण विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करावे.
यावेळी सर्व मान्यवरांनी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे असलेल्या विविध युनिटला भेट देऊन तेथील सर्व उत्पादनांची माहिती घेतली. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक शेतकरी बांधव श्री.सय्यद वजीरोद्दिन काजी यांना जैविक द्रवरूप संघ देण्यात आले. यावेळी केव्हीकेचे सर्व विषय विशेषज्ञ, इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
















.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment