Wednesday, August 20, 2025

बैल पोळ्याची पंचसुत्री पाळा : अण बैलास होणारा धोका टाळा

 




बैल पोळ्याची पंचसुत्री पाळा : अण बैलास होणारा धोका टाळा 

आपल्या भारतीय संस्कृतीत मनुष्य, प्राणी,चंद्र,सूर्य ,नदी व निसर्गास कृतज्ञता व्यकत करण्या साठी विविध सण साजरे करतात.त्याच प्रमाणे आपल्या भागात म्हणजेच महाराष्ट्रात सरत्या श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला सर्व महाराष्ट्रात,तसेच सिमें शेजारी असण्या तेलंगना,कर्नाटक व मध्य प्रदेशातील सर्व बळीराजा मोठया उसहात" बैलपोळा" साजरा करतात.
दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/विहीरी तसेच ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.
या सणासाठी बळीराजासमोठा उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी बळीराजा आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात.   गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.  यंदा वरूण राजा जोरदार बरसत आहे आणि 
  यंदा लम्पी आजार फैलाव झालेला आहे. त्यामुळे लम्पी झालेल्या बैलांना इतर जनावरात मिसळू नका. लम्पीग्रस्त बैलाची योग्य काळजी घेऊन त्यांना आराम द्या.  त्याच बरोबर   
या सणात आपण नकळत काही गोष्टी आपला बैल जोडी रूबाबदार    साठी करतो पण त्याची इजा आपल्या बैल स होते तर या बैलपोळास जरा सावधगिरी घेऊ त्यासाठीच खालील बाबींवर बिचार करू
1) बैलांना नद्या, नाले, ओढे अशा ठिकाणच्या पाण्यात आंघोळ घातली जाते. अशा पाण्यात जिवाणू, विषाणू असतात. बैल आंघोळ घालत असताना हेच पाणी पितात. याशिवाय बैलांना जर जखमा झाल्या असतील तर अशा जखमांमधून दूषित पाण्यातील जंतू बैलांच्या शरीरात जातात. आणि बैलांना विविध आजाराचा संसर्ग होतो. 
    
     मग काळजी कायघ्यावी: हे टाळायच असेल तर  बैलांना स्वच्छ पाण्यानेच आंघोळ घाला.जर सार्वजनिक ठिकाणी जर आंघोळ घातली असेल तर बैलांच्या अंगावर बाह्यपरजिवीनाशक फवारा आणि त्यांना जंतनाशक पाजा. बैलाच्या जखमांवर उपचारासाठी प्रतिजैविकांची योग्य मात्रा पशुवैद्याकडून टोचून घ्या.

2) बैल जास्तीत-जास्त आकर्षक दिसावे म्हणून शेतकरी शिंगांणा आकार देण्यासाठी ती साळतात.  शिंग साळण्यासाठी वापरलेली वस्तू निर्जंतुक केलेली नसेल तर बैलाला जखम होऊन शिंगाच्या कर्करोग होऊ शकतो. शिंगाच्या कर्करोगावर शिंग समूळ कापणे हाच एकमेव उपाय राहतो. त्यामुळे शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते. साळण्यासाठी वापरलेली वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता असते. शिंग रंगवण्यासाठी ऑइल पैंट्सचा वापर करतात ज्यात झिंक ऑक्साइड, टायटॅनियम डायऑक्साइड, कॅडमियम सारखे त्वचेला घातक रसायने असतात.

मग काळजी कायघ्यावी :
शिंगाना नैसर्गीक रंग द्या आणि शिंग साळणे शक्यतो टाळा. शिंग साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्या. 

3)काही शेतकरी बैल तजेलदार,मांसल व धष्टपुष्ट दिसावे म्हणून बैलांना तेलातून अंडी पाजतात. 
 हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने  पाजताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेतून फुफ़ुसात जात. त्यामुळे फुफ़ुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया होऊन बैल दगाऊ शकतात.  त्यामुळे
मिश्रण पाजताना योग्य काळजी घ्यावी 
मग  काळजी काय घ्यावी: त्या ऐवजी सरकी पेंड, शेंगदाणा पेंड यासारख्या तेलबियांच्या पेंडी  आपण बैलांना देऊ शकतो. 

4) पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पूरणपोळ्या,कडधान्याचा भरडा चारला जातो. प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाला पोटाच्या व्याधी निर्माण होतात. रक्तातील लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण वाढून जीवाला धोका निर्माण होतो. पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते, चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळते. अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे. 

मग काळजी काय घ्यावी:

बैलांना पचेल इतकच खाऊ घालाव आणि
प्राथमिक उपचार म्हणून पाणी सोबत खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावे. पाजताना जनावर ठसकणार नाही याची काळजी घावी.

5) बैलांची संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. फटाके वाजवले जातात.  मोठा आवाज आणि गर्दीमुळे बैल बिथरतात. अशा वेळेस बैल उधळण्याची शक्यता असते.  मिरवणूकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात अश्या वेळी अनेक ठिकाणी दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होतात. काही बैलांना वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात आणि त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता असते.

मग काळजी कायघ्यावी:
बैलास फटक्या पासून दूर ठेवावे

बैल  पैळाचा शुभेच्छां




****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

Saturday, August 2, 2025

पीएम किसान सन्मान निधी चा २० वा हप्ता हस्तांतरण थेट प्रक्षेपण व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 



पीएम किसान सन्मान निधी चा २० वा हप्ता हस्तांतरण थेट प्रक्षेपण व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून दिनांक ऑगस्ट 2025 रोजी पी एम किसान सन्मान निधी चा २० व्या हप्त्याचे हस्तांतरण थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात आले या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि यानिमित्त शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. श्री प्रकाश देशमुख, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन मा. डॉ. सूर्यकांत पवार, कृषी तंत्र महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य मा. श्री दत्तात्रय मुळे, एनएआरपी छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी प्राध्यापक मा. डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक मा. डॉ. दिप्ती पाटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर श्री. अशोक निर्वळ यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी च्या २० व्या हप्ता हस्तांतरण कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच माननीय पंतप्रधान यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण देखील यावेळी करण्यात आले. या सोबतच उपस्थित शास्त्रज्ञांनी विविध विषयावर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध सुविधा विविध विस्तार कार्यक्रम तसेच केव्हीके मार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम यांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सूर्यकांत पवार म्हणाले की, सद्य परिस्थितीमध्ये जवळपास सर्वच पिकांना 35 ते 40 दिवसाचा कालावधी झाला असून कापूस मका यासारख्या पिकांमध्ये खताचा दुसरा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. या सोबतच तूरकापूस आद्रक इत्यादी पिकामध्ये बायोमिक्स चा वापर शेतकरी बांधवांनी करावा यामुळे सद्य परिस्थितीत येणारे मर, कंदकुज, आकस्मित मर इत्यादी रोगांपासून पिकाचे संरक्षण होण्यास मदत होते.

यावेळी डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी खरीप पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वच पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये निरीक्षण, सर्वेक्षण यासोबतच कामगंध सापळे यांचा वापर, निंबोळी अर्काचा वापर आणि पिकानुसार उपलब्ध असलेल्या विविध कामगंध सापळ्यांचा वापर हे फार महत्त्वाचे आहेत. सर्व पिकांमधील विविध किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर प्रभावशाली दिसून आलेला असून शेतकरी बांधवांनी निंबोळी अर्काचा देखील वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आर्थिक नुकसानीची पातळी जर दिसून आली तरच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. यावेळी ते म्हणाले की, हुमणी, गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळी यासारख्या किडींचे नियंत्रण करत असताना सामुदायिक पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या उपाययोजना सर्व शेतकरी बांधवांनी सामुदायिकरीत्या केल्यानंतर या किडींचे व्यवस्थापन होण्यास मदत होते.

यावेळी डॉ. भावर यांनी अद्रक कंदसड याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले.























****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/







Friday, August 1, 2025

हुमणीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा- मा.डॉ.दिगांबर पटाईत

 



हुमणीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा- डॉ.दिगांबर पटाईत

११३ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

            कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या द्वारे दिनांक ०१ ऑगस्ट,२०२५ रोजी ११३ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला होता.

            या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख मा.डॉ.दिप्ती पाटगावकर या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनामकृवि परभणी चे कृषी कीटकशास्त्रज्ञ मा.डॉ.दिगांबर पटाईत यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागाचे निवृत्त विभागीय कृषि सहसंचालक मा.डॉ.तुकाराम मोटे यांच्यासह केव्हीके येथील विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतुरकर, डॉ.संजूला भावर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

            यावेळी बोलताना डॉ.पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि त्या म्हणाल्या कि, कृषि विज्ञान केंद्रात वेळोवेळी विविध विस्तार कार्यक्रमांचे आयोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात येते. तसेच शेतकरी उपयुक्त विविध निविष्ठा केव्हीकेला उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांचा शेतकरी बांधवांनी उपयोग करून घ्यावा. तसेच कीड आणि रोग व्यवस्थापन साठी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

            या कार्यक्रमात हुमणी अळीचे एकात्मिक नियंत्रण याविषयी बोलताना डॉ. पटाईत म्हणाले किहुमणी हि अत्यंत घातक कीड असून त्याचे वेळेवरच एकात्मिक व सामुदायिक नियंत्रण करणे गरजेचे आहे. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. एक अळी प्रति चौरस मीटर किंवा एका झाडावर सरासरी २० किवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे असणे हि या अळीची आर्थिक नुकसान पातळी असते. अशावेळी एकात्मिक व्यवस्थापन उपाय योजावेत. बाभूळकडुनिंबबोर इ. झाडांवरील भुंगेरे रात्री ७ ते ९ वाजता काठीच्या साहाय्याने फांद्या हलवून खाली पडून जमा करावेत व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. भुंगे गोळा करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिक रित्या प्रति एकरी एक प्रमाणे प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. जैविक नियंत्रणमध्ये परोपजीवी बुरशी मेटारायझियम ऑनिसोपिली या उपयुक्त बुरशीचा १० किलो प्रति हेकटर प्रमाणात जमिनीत वापर करावा. तसेच हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमीचा वापर करावा. मेटारायझियम ऑनिसोपिलीचा वापर हा फार प्रभावी उपाय दिसून आलेला आहे. याच्या नियंत्रणासाठी तज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. हुमणीच्या व्यवस्थापणासाठी त्याचा जीवनक्रम जाणून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, शंखी गोगलगाय च्या व्यवस्थापनासाठी देखील एकात्मिक आणि सामुदायिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये शंखी गोगल गाय हाताने गोळा करून नष्ट करणे सर्वात प्रभावी आहे. यासोबत २ टक्के मिठाची फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणामध्ये मेटाल्डीहाईड २ किलो प्रति एकर याप्रमानामध्ये याचा वापर करावा.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संजूला भावर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी केव्हीकेच्या सर्च अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजन केले.











****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/



मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...