Saturday, August 2, 2025

पीएम किसान सन्मान निधी चा २० वा हप्ता हस्तांतरण थेट प्रक्षेपण व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 



पीएम किसान सन्मान निधी चा २० वा हप्ता हस्तांतरण थेट प्रक्षेपण व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून दिनांक ऑगस्ट 2025 रोजी पी एम किसान सन्मान निधी चा २० व्या हप्त्याचे हस्तांतरण थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात आले या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि यानिमित्त शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. श्री प्रकाश देशमुख, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन मा. डॉ. सूर्यकांत पवार, कृषी तंत्र महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य मा. श्री दत्तात्रय मुळे, एनएआरपी छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी प्राध्यापक मा. डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक मा. डॉ. दिप्ती पाटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर श्री. अशोक निर्वळ यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी च्या २० व्या हप्ता हस्तांतरण कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच माननीय पंतप्रधान यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण देखील यावेळी करण्यात आले. या सोबतच उपस्थित शास्त्रज्ञांनी विविध विषयावर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध सुविधा विविध विस्तार कार्यक्रम तसेच केव्हीके मार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम यांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सूर्यकांत पवार म्हणाले की, सद्य परिस्थितीमध्ये जवळपास सर्वच पिकांना 35 ते 40 दिवसाचा कालावधी झाला असून कापूस मका यासारख्या पिकांमध्ये खताचा दुसरा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. या सोबतच तूरकापूस आद्रक इत्यादी पिकामध्ये बायोमिक्स चा वापर शेतकरी बांधवांनी करावा यामुळे सद्य परिस्थितीत येणारे मर, कंदकुज, आकस्मित मर इत्यादी रोगांपासून पिकाचे संरक्षण होण्यास मदत होते.

यावेळी डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी खरीप पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वच पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये निरीक्षण, सर्वेक्षण यासोबतच कामगंध सापळे यांचा वापर, निंबोळी अर्काचा वापर आणि पिकानुसार उपलब्ध असलेल्या विविध कामगंध सापळ्यांचा वापर हे फार महत्त्वाचे आहेत. सर्व पिकांमधील विविध किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर प्रभावशाली दिसून आलेला असून शेतकरी बांधवांनी निंबोळी अर्काचा देखील वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आर्थिक नुकसानीची पातळी जर दिसून आली तरच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. यावेळी ते म्हणाले की, हुमणी, गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळी यासारख्या किडींचे नियंत्रण करत असताना सामुदायिक पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या उपाययोजना सर्व शेतकरी बांधवांनी सामुदायिकरीत्या केल्यानंतर या किडींचे व्यवस्थापन होण्यास मदत होते.

यावेळी डॉ. भावर यांनी अद्रक कंदसड याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले.























****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/







No comments:

Post a Comment

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...