वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, फ्रेंडस् ऑफ वुमेन्स वर्ल्ड बँकिंग इंडिया, अहमदाबाद,गुजरात संस्थेअंतर्गत लोकसाथी प्रतिष्ठान संस्था व मानव ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ मार्च, २०२५ रोजी शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य व विस्तार कार्यकर्ते यांच्यासाठी "नैसर्गिक शेती पद्धती व संवाद कौशल्य विकास" या विषयावर एक दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ यांची उपस्थिती होती. तसेच संस्थेचे मा.श्री.कमलाकर रायबोले, मा.श्री.नितीन कोल्हे, मा.श्री.गणेश सोनवणे आणि केव्हीकेचे डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), श्री.विवेक पतंगे, कार्यक्रम सहायक तसेच राजे संभाजी शेतकरी उत्पादक कंपनी, खुलताबादचे संचालक मा.श्री.भास्कर वेताळ आणि पाताळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, बदनापूरचे संचालक मा.श्री.नामदेव भुजंग यांच्यासह सदस्य यांची उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या की, नैसर्गिक शेती ही आजच्या काळाची गरज असून शेतकऱ्यांनी हळूहळू नैसर्गिक शेतीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच विविध निविष्ठांची निर्मिती आपल्याच शेतीवर करून त्यांचा प्रभावीपणे वापर आपल्या शेतात करणे आवश्यक आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला शाश्वत आणि समृद्ध शेती द्यायची असेल तर नैसर्गिक शेतीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विस्तार कार्यकर्त्यांनी विस्तार कार्यक्रम आयोजित करत असताना संवाद कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. योग्य संवाद कौशल्य हे यशस्वी विस्तार कार्यक्रमासाठी अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना श्री.विवेक पतंगे यांनी शाश्वत शेतीसाठी मृदा संवर्धन या विषयावर तर डॉ.अनिता जिंतूरकर यांनी नैसर्गिक शेतीमध्ये पशुधनाचे महत्व, डॉ.संजूला भावर यांनी फळपिकांमध्ये नैसर्गिक निविष्ठांचा प्रभावी वापर आणि फळबाग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तर डॉ.बस्वराज पिसुरे यांनी नैसर्गिक शेतीची ओळख व गरज, नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा निर्मिती आणि विस्तार कार्यकर्त्यांसाठी संवाद कौशल्य विकास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे शास्त्रज्ञांनी निरसन केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून आमच्या पुढील शेती आणि विस्तार कार्यक्रम नियोजनासाठी याचा नक्कीच फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली. श्री.गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी श्री.जयदीप बनसोडे, श्री.जयदेव सिंगल, श्री.विशाल दाभाडे यांनी नियोजन केले.













No comments:
Post a Comment