वनामकृवि, परभणी अंतर्गत केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे
आरकेव्हीवाय योजने अंतर्गत जैविक निविष्ठा व कृषी उद्योग या विषयावर
किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे
कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ आणि ग्रामोदय जनकल्याण संस्था, छत्रपती
संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ डिसेंबर, २०२५ रोजी किसान गोष्टी
कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेच्या कार्यक्रम
समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय
कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर चे सहयोगी संशोधन संचालक मा.डॉ.सुर्यकांत
पवार, गंगापूर पंचायत समिती माजी सभापती श्रीमती.ज्योतीताई गायकवाड, ग्रामोदय
जनकल्याण संस्था, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्री.अविनाश गायकवाड यांची उपस्थिती
होती. तसेच यावेळी श्री.आर.टी. पठारे, उद्योग प्रशिक्षक, श्री.विजय जाधव
केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर
यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना
डॉ.सुर्यकांत पवार म्हणाले कि, महिला शेतकऱ्यांनी कृषि प्रक्रिया उद्योगाकडे वळणे
आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने कृषि
उद्योग उभा करावेत. तसेच कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या मार्फत उपलब्ध
करून देण्यात आलेल्या जैविक खते, जैविक बुरशीनाशके व जैविक कीटकनाशके यांचा मोठ्या
प्रमाणावर करणे आवश्यक आहे. यासाठी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर
यांच्यामार्फत वेळोवेळी प्रशिक्षण व विविध विस्तार कार्यक्रम आयोजित केले जाणार
असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनींनी सहभागी व्हावे.
यावेळी श्रीमती.ज्योतीताई गायकवाड आणि
श्री.अविनाश गायकवाड यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले व महिलांनी शासनाच्या या
विविध उपक्रम आणि योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. तसेच महिला विकासाच्या
कामामध्ये ग्रामोदय जनकल्याण संस्था नेहमीच केव्हीकेसोबत कार्य करेल असे सांगितले.
कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर
च्या कार्यक्रम समन्वयक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच कृषि प्रक्रिया
उद्योग उभारणी आणि त्यातील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी
शेवया उद्योग, मसाला प्रक्रिया उद्योग, मेणबत्ती निर्मिती उद्योग, तुती उद्योग,
इत्यादी उद्योगांविषयी सविस्तर माहिती दिली आणि या सर्वाचे प्रशिक्षण केव्हीके,
छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असल्याचे सांगितले.
डॉ.अनिता जिंतूरकर यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध प्रक्रिया उद्योग या विषयी माहिती दिली. डॉ.बस्वराज पिसुरे यांनी जैविक निविष्ठा निर्मिती आणि त्यांचा शेतीसाठी वापर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तर श्री.आर.टी. पठारे व श्री.विजय जाधव कृषी उद्योग उभारणीसाठी यांनी शासनाच्या विविध योजना, प्रकल्प प्रस्ताव बनविणे इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, सिल्लोड व इतर तालुक्यातील महिला शेतकरी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे केले यांनी तर आभार डॉ.अनिता जिंतूरकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केव्हीकेतील कर्मचारी श्री.सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.विशाल दाभाडे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :




















No comments:
Post a Comment