Thursday, December 11, 2025

मौजे पाणवडोद खुर्द ता सिल्लोड येथे दि.१०.१२.२०२५ रोजी कापुस प्रक्षेत्र दिन संपन्न

 



मौजे पाणवडोद खुर्द ता सिल्लोड येथे दि.१०.१२.२०२५ रोजी कापुस प्रक्षेत्र दिन संपन्न.

        कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर -१ चे वरिष्ठ शास्त्रज्ञा, प्रकल्पाच्या नोडल अधिकारी डॉ. दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), प्रकल्पाचे उप-अन्वेषक डॉ. बस्वराज पिसुरे,  यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे पाणवडोद खुद (ता. सिल्लोड)' येथील प्रगतिशील शेतकरी श्री नारायण गवांदे यांचा शेतावर कापूस कमी अंतरावर लागवड तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस प्रक्षेत्रावर प्रक्षेत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
        जिल्ह्यातील पाणवडोद ता सिल्लोड) येथे भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर -१ यांच्या संयुक्त विद्यमाने कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीन केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. 
        यासाठी आयोजित प्रक्षेत्र दिन कार्यक्रमामध्ये विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतीश कदम यांनी कापुस हे महत्त्वाचे पिक असुन कापसांची उत्पादन वाढविण्यासाठी एकात्मिक पिक पद्धतीचा व सुधारीत कापुस लागवड तंत्रज्ञानांचा अवलंब करावा तसेच कमी अंतराची लागवड तंत्रज्ञान, दादा लाड लागवड, सघन लागवड तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली कापसाच्या उत्पादनवाढीसाठी कपाशी लागवडी नंतर ३०-३५ दिवसांनी गळ फांदी काढुन टाकणे, ८०-८५ दिवसांनी शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून, फळ फांदीला योग्य प्रकारे अन्रद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या, आकार वाढवून, झाडांची एकरी संख्या वाढेन उत्पन्न वाढ होईल. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. अन्रद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक  व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे. जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे, इत्यादी पद्ध्तीचा अवलंब करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी कापसाची फरदड न घेता कापसाच्या पऱ्हाटीची कुट्टी करून ती जमिनीमध्ये कुजवावी. जेणेकरून जमिनीला मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खत उपलब्ध होते व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढतो, शेतकऱ्यांना मार्गदर्शक केले. तसेच प्रकल्पातील शेतकरी श्री नारायण गवांदे, श्री कौतिक मिरगे यांनी शेतकऱ्यांना सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले व अनुभव सांगितले. तांत्रिक प्रशिक्षक जयदेव सिंगल यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन श्री सतिश कदम, श्री जयदेव सिंगल व श्री नारायण गवांदे यांनी केले.


****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account


No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...