सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पन्नात वाढ - तांत्रिक प्रशिक्षक श्री सतीश कदम
दिनांक ०९.१२.२०२५ रोजी असाडी ता.सिल्लोड येथे कापूस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न
भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्यां उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र राज्यातं राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, नोडल अधिकारी डॉ. दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), प्रकल्पाचे उप-अन्वेषक डॉ. बस्वराज पिसुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे असाडी ता सिल्लोड येथील प्रगतिशील शेतकरी निलेश सिरसाठ यांच्या कापूस प्रक्षेत्रावर प्रक्षेत्र दिन कार्यक्रमाचे दिनांक ०९.१२.२०२५ रोजी आयोजन करण्यात आला होते.
प्रक्षेत्र दिन कार्यक्रमामध्ये तांत्रिक प्रशिक्षक श्री सतीश कदम यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञाना विषयी सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढीकरिता योग्य अंतर, गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्त्पादनात वाढ होईल, किडी व रोगांचे व्यवस्थापन, पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे लावावेत तसेच पराटीची कुट्टी करावी असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी पुढील वर्षी कमी अंतराचा व सघन लागवड तंत्रज्ञानानुसार लागवड करून कापसांचे उत्पन्न वाढवावे. या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच माती परीक्षण करून घेऊनचं पिकांचे नियोजन करावे. तसेच प्रकल्पाचे उद्देश शेतकऱ्यांना समजावुन सांगितले. तसेच सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान प्रगतिशील शेतकरी श्री अंबादास मिरगे, श्री आण्णा मिरगे यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना आपला अनुभव सांगितला. तांत्रिक प्रशिक्षक जयदेव सिंगल यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बायोमिक्स, जैविक संघ यांचा बद्दल मार्गदर्शन केले व आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सतिश कदम, श्री जयदेव सिंगल, श्री कौतिक मिरगे, श्री आण्णा मिरगे, श्री कमलाकर सिरसाठ, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :




No comments:
Post a Comment