Wednesday, December 10, 2025

वनामकृवि, परभणी अंतर्गत केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ चे चार संपर्क शेतकरी विविध पुरस्काराने सन्मानित

वनामकृवि, परभणी अंतर्गत केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ चे चार संपर्क शेतकरी विविध पुरस्काराने सन्मानित

            वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर च्या एकूण चार शेतकरी बांधवांची विविध पुरस्कारासाठी निवड झाली आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व कृषि जागरण समूह, नवी दिल्ली यांच्याद्वारे देण्यात येणारा फार्मर ऑफ द ईयर पुरस्कार-२०२५ हा पुरस्कार केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ चे संपर्क तथा प्रगतशील शेतकरी श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे, रा.सिंदोन, ता.छत्रपती संभाजीनगर आणि प्रगतशील कृषि उद्योजक श्री.शेकुनाथ आण्णासाहेब निचित, रा.पिंप्रीराजा, ता.छत्रपती संभाजीनगर यांना त्यांच्या कृषि क्षेत्र आणि कृषि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध मान्यवरांच्या हस्ते दिनांक ०८.१२.२०२५ रोजी नवी दिल्ली येथे देण्यात आला.

           तसेच वनामकृवि, परभणी अंतर्गत केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ चे संपर्क तथा प्रगतशील शेतकरी श्री.यज्ञेश वसंतराव कातबने, रा.धनगाव, ता.पैठण आणि प्रगतशील कृषि उद्योजिका श्रीमती. सुनंदा शिवाजी क्षिरसागर, रा.पांगरा, ता.पैठण यांना वैज्ञानिक शेती व कृषि उद्योग व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, नवकल्पना आणि ज्ञान प्रसाराच्या माध्यमातून कृषी विकासात दिलेल्या योगदानाबद्दल  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचाद्वारे देण्यात येणारा शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार-२०२५ घोषित झाला आहे. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू मा.डॉ.इंद्र मणी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक ११.१२.२०२५ रोजी या पुरस्कारप्राप्त्यांचा सन्मान होणार आहे.

          याप्रसंगी केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी चारही पुरस्कारप्राप्त्यांचे कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे, रा.सिंदोन, ता.जि.छत्रपती संभाजीनगर

श्री.शेकुनाथ आण्णासाहेब निचित, रा.पिंप्रीराजा, ता.जि.छत्रपती संभाजीनगर

श्री.यज्ञेश वसंतराव कातबने, रा.धनगाव, ता.पैठण,  जि.छत्रपती संभाजीनगर

श्रीमती. सुनंदा शिवाजी क्षिरसागर, रा.पांगरा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर



****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account





No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...