मौजे घोसला ता. सोयगाव येथे सुधारीत कापुस लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..
भा. कृ. अनु. प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी मा. श्री रविंद्र पाटील. विशेष उपस्थित वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, नोडल अधिकारी डॉ. दिप्ती पाटगावकर, मा. श्री चंद्रकांत पाटील मा.सभापती, प्रकल्पाचे उप-अन्वेषक विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) डॉ.संजुला भावर, मंडळ कृषि अधिकारी श्री. पी. आर. सपकाळ, उप कृषि अधिकारी श्री पी.आर. पाटील, स.कृ.अ. एल. टी. साळवे प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री. सतिष कदम, श्री. जयदेवसिंग सिंगल या सर्वांचा उपस्थितीत दि २४-१२-२०२५ रोजी मौजे घोसला ता सोयगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री समाधान पाटील यांच्या कापूस प्रक्षेत्रावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये श्री दिप्ती पाटगावकर यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञाना विषयी सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढीकरिता योग्य अंतर, गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्त्पादनात वाढ होईल, शेतकऱ्यांनी पुढील वर्षी कमी अंतराचा व सघन लागवड तंत्रज्ञानानुसार लागवड करून कापसांचे उत्पन्न वाढवावे. येणाऱ्यां काळात नैसर्गिक शेती बद्दलचे महत्त्व याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ.बस्वराज पिसुरे यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे, कपाशीतील किडी व रोगांचे व्यवस्थापन, पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे लावावेत तसेच पराटीची कुट्टी करावी, त्यामुळे शेतात २-३ टन येवढा खत तयार होतो, व सेंद्रिय कर्ब वाढतो असे ते म्हणाले.शेतात होणारा हूमणी अळीचा प्रादुर्भाव यासाठी काय उपाययोजना कराव्यात या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. माती परीक्षण करून घेऊनचं पिकांचे नियोजन करावे. प्रकल्पाचे उद्देश शेतकऱ्यांना समजावुन सांगितले.
डॉ.संजुला भावर यांनी सध्या परिस्थितीच्यां फळ पिकाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. केळी, आंबा, पेरू या फळबागेत काय उपाययोजना कराव्यात, या बद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. महाराष्ट्र कृषिभुषण श्री रविंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना कमी खर्चाची पिके घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुर, सोयाबीन, पेरू अशा अनेक पिकांची माहिती दिली व शेतकऱ्यांनी कमी खर्च करून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यांचा बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री. पाटील यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेची व कृषि विस्तार ॲप बद्दल माहीती दिली. तसेच सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान प्रगतिशील शेतकरी श्री. समाधान पाटील या तंत्रज्ञानामुळे कसा फायदा झाला याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री. सतिष कदम आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सतिष कदम, श्री जयदेव सिंगल, श्री. समाधान पाटील, श्री. निवृत्ती पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते..
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
No comments:
Post a Comment