Thursday, January 1, 2026

मौजे सय्यदपुर येथे कापूस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

मौजे सय्यदपुर येथे कापूस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्यां उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र राज्यातं राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, नोडल अधिकारी डॉ. दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण),  प्रकल्पाचे उप-अन्वेषक डॉ. बस्वराज पिसुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली दि ३०-१२-२०२५ रोजी मौजे सय्यदपुर ता छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी कैलास ऊकीडे यांच्या कापूस प्रक्षेत्रावर प्रक्षेत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. 

प्रक्षेत्र दिन कार्यक्रमामध्ये तांत्रिक प्रशिक्षक श्री सतीश कदम यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञाना विषयी सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढीकरिता योग्य अंतर, गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्त्पादनात वाढ होईल, किडी व रोगांचे व्यवस्थापन, पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे लावावेत तसेच पराटीची कुट्टी करावी असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी पुढील वर्षी कमी अंतराचा व सघन लागवड तंत्रज्ञानानुसार लागवड करून कापसांचे उत्पन्न वाढवावे. या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच माती परीक्षण करून घेऊनचं पिकांचे नियोजन करावे.

तसेच प्रकल्पाचे उद्देश शेतकऱ्यांना समजावुन सांगितले. तसेच सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान प्रगतिशील शेतकरी श्री संतोष शेळके, श्री बद्री  शेळके यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना आपला अनुभव सांगितला. तांत्रिक प्रशिक्षक जयदेव सिंगल यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बायोमिक्स, जैविक संघ यांचा बद्दल मार्गदर्शन केले व आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सतिश कदम, श्री जयदेव सिंगल, श्री बद्री शेळके , श्री संतोष शेळके, श्री कैलास ऊकीडे श्री विलास ऊकिडे श्री विष्णू ऊकीडे, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते..


****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...