मौजे हातमाळी ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथे सुधारीत कापुस लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
भा. कृ. अनु. प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी हातमाळी चे सरपंच, श्री. हिरालाल भगुरे व उपसरपंच श्री. सोमिनाथ घायट, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, नोडल अधिकारी डॉ. दिप्ती पाटगावकर, प्रकल्पाचे उप-अन्वेषक विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डाँ बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र) श्री. अशोक निर्वळ, प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री. सतिष कदम, श्री. जयदेवसिंग सिंगल या सर्वांचा उपस्थितीत दि ३१-१२-२०२५ रोजी मौजे हातमाळी ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी श्रीमती प्रभावती पडूळ यांच्या कापूस प्रक्षेत्रावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये श्री दिप्ती पाटगावकर यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञाना विषयी सविस्तर माहिती दिली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढील वर्षी कमी अंतराचा व सघन लागवड तंत्रज्ञानानुसार लागवड करून कापसांचे उत्पन्न वाढवावे. माती परीक्षण करूनचं पिकांचे नियोजन करावे. कृषि विज्ञान केंद्रातील उपलब्ध जैविक निविष्ठांबद्दल माहीती दिली येणाऱ्यां काळात नैसर्गिक शेती बद्दलचे महत्त्व याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डाँ बस्वराज पिसुरे यांनी कापसाच्या उत्पादन वाढीकरिता योग्य अंतर, गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्त्पादनात वाढ होईल, कपाशीतील किडी व रोगांचे व्यवस्थापन, पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे लावावेत तसेच पराटीची कुट्टी करावी, त्यामुळे शेतात २-३ टन येवढा खत तयार होतो, व सेंद्रिय कर्ब वाढतो असे ते म्हणाले.शेतात होणारा हूमणी अळीचा प्रादुर्भाव यासाठी काय उपाययोजना कराव्यात या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे उद्देश शेतकऱ्यांना समजावुन सांगितले.
श्री. अशोक निर्वळ, यांनी सध्या परिस्थितीतील हवामानानुसार पीक व्यवस्थापना बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यांनी तसेच सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान प्रगतिशील शेतकरी श्री धोडींबा लिबांजी घायट या तंत्रज्ञानामुळे कसा फायदा झाला याबद्दल आपले अनुभव सांगितले. श्री. सतिष कदम आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सतिष कदम, श्री जयदेवसिंग सिंगल, श्री. धोडींबा लिंबाजी घायट, श्रीमती प्रभावती पडूळ यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते..
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
No comments:
Post a Comment