पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करावा - मा.डॉ.इन्द्र मणि
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे थेट प्रक्षेत्रावर जाऊन माननीय कुलगुरूंनी केले अभिनंदन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिंदोन येथील शेतकरी मा.श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांना नुकताच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली चा मानाचा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) हा पुरस्कार घोषित झाला आहे. याप्रसंगी मा.श्री.शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे सन्मानीय कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणि यांनी त्यांच्या प्रक्षेत्राला दिनांक १८.०२.२०२६ रोजी भेट दिली.
यावेळी मा.डॉ.इन्द्र मणि यांनी श्री.शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या सर्व प्रक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रक्षेत्रावर घेण्यात येत असलेल्या गुलाब शेतीला भेट दिली. यासोबत जीप्सोलीना, स्नॅपड्रॅगन या नाविन्यपूर्ण पिकाच्या फुलशेतीला भेट देऊन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी मा.डॉ.इन्द्र मणि म्हणाले कि, हा फार मानाचा पुरस्कार असून तो मिळणे फार उल्लेखनीय असून शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारात आता आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले. शेतकरी बंधू हे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतावर करत आहेत आणि यामध्ये त्याना फार मोठ्या प्रमाणावर यश येताना दिसत आहे. अशा उल्लेखनीय शेतकऱ्यांची माहिती इतर शेतकरी बांधवांना देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येऊन या विविध तंत्रज्ञानाचा प्रसार इतर शेतकरी बांधवांमध्ये करणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी बांधवा सोबत माननीय कुलगुरू महोदयांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी माननीय कुलगुरू यांच्यासोबतच महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे चे माजी महासंचालक मा.श्री.रावसाहेब भागडे, वनामकृवि, परभणीचे सन्माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर चे सहयोगी संचालक संशोधन मा.श्री.सुर्यकांत पवार, एमजीएम परिसर चे संचालक मा.श्री.धापके, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर च्या प्रभारी कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर यांची उपस्थिती होती.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे सन्मानीय कुलगुरू, सन्माननीय संचालक विस्तार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत श्री.दादासाहेब दौलतराव शिंदे यांचा पुरस्कार अर्ज भा.कृ.अनु.प-भारतीय कृषि संशोधन केंद्र, नवी दिल्ली येथे सादर करण्यात आला होता. पूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून एक याप्रमाणे शेतकऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. महाराष्ट्रातून यावर्षी च्या पुरस्कारासाठी मा.श्री.दादासाहेब शिंदे यांची निवड झालेली आहे.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :










No comments:
Post a Comment