Tuesday, November 11, 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी तर्फे रब्बी गहू व हरभरा पिकाची सुधारित बियाण्यांचे प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न




पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी तर्फे रब्बी गहू व हरभरा पिकाची सुधारित बियाण्यांचे प्रात्यक्षिक बियाणे 

वाटप कार्यक्रम संपन्न

मा.कुलगुरू व मा. संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 /11/2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे पैठण व फुलंब्री तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त रब्बी  गहू व हरभरा पिकाची सुधारित बियाण्यांचे प्रात्यक्षिक देऊन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात  अध्यक्षस्थानी डॉ. दीप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती धनश्री जाधव छत्रपती संभाजी नगर  होत्या. 

या कार्यक्रमांत हरभरा व गहू सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे श्री अशोक निर्वळ व श्री विवेक पतंगे यांनी केले. तसेच डॉ अनिता जिंतुरकर यांनी थंडीमध्ये जनावरांच्या खाद्य व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात केव्हीकेतील शास्त्रज्ञ डॉ बस्वराज पिसुरे, डॉ संजुला भावर शिवा काजळे आत्मा विभागाच्या श्रीमती आशा बर्गे व इतर कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.









****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/


No comments:

Post a Comment

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...