कृषि विज्ञान केंद्रांची आठवी वार्षिक विभागीय कार्यशाळा संपन्न
उत्कृष्ट सादरीकरण प्रमाणपत्र देऊन केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ सन्मानित
भा.कृ.अनु.प-अटारी, पुणे यांच्यामार्फत दिनांक २०-२२ जुलै, २०२५ या दरम्यान भूज, गुजरात येथे अटारी झोन-VIII अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांची आठवी वार्षिक विभागीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये या तीन राज्यातील ८२ कृषि विज्ञान केंद्रांनी त्यांचे सन २०२४ चे वार्षिक प्रगती अहवाल सादर केले. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर चा वर्ष २०२४ चा वार्षिक प्रगती अहवाल केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी संबधित कार्यशाळेत सादर केला. वर्ष २०२४ मध्ये राबवण्यात आलेल्या विविध मोहीम, प्रकल्प, दर्जेदार व उत्तम निविष्ठा उपलब्धता, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच इतर विस्तार कार्यक्रम यांची माहिती यावेळी त्यांनी सादर केली. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी सन्मानीय कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणी, संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाचे संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.डी. बी. उंदिरवाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर मार्फत करण्यात आलेले कार्य उल्लेखनीय असून यापुढेही अशाच प्रकारे कार्य करावे व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना याचा फायदा करून देण्यात यावा, असे उपस्थित मान्यवरांनी सांगतिले. मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केलेल्या सादरीकरणास या कार्यशाळेत उत्कृष्ट सादरीकरण प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळीमा.डॉ.ए.के.सिंग, माजी कुलगुरू, बीएयु, सबौर, मा.डॉ.आर.एम.चौहान, कुलगुरू, एसडीएयु, एस के नगर, मा.डॉ.एम.एम.अधिकारी, माजी कुलगुरू, बीसीकेव्ही, मोहनपुर, मा.डॉ.पी.दास, माजी डीडीजी (कृषि विस्तार), भा.कृ.अनु.प,.नवी दिल्ली, मा.डॉ.के.डी.कोकाटे, माजी डीडीजी (कृषि विस्तार), भा.कृ.अनु.प,. नवी दिल्ली, मा.डॉ.प्रभु कुमार एस, माजी संचालक, भा.कृ.अनु.प-अटारी, बेंगलोर, मा.डॉ.एस.के.रॉय, संचालक, भा.कृ.अनु.प-अटारी, पुणे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांना सन्मानित करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :




No comments:
Post a Comment