मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर येथे भेट
वसतंराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा.डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक ०७ मे, २०२५ रोजी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केव्हीकेद्वारे सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी वसतंराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे संचालक शिक्षण मा.डॉ.भगवान आसेवार, संचालक संशोधन मा.डॉ.खिजर बेग, संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन मा.डॉ.सुर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग चे प्रभारी अधिकारी मा.डॉ.संजय पाटील यांनीही केव्हीकेला भेट दिली. यावेळी केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरच्या प्रमुख मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केव्हीके मध्ये सुरु असलेल्या व भविष्यात नियोजित असणाऱ्या उपक्रम व विविध विस्तार कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी मा.कुलगुरू व इतर मान्यवरांनी केव्हीकेमध्ये सुरु असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. आणि भविष्यात देखील शेतकरी देवो भवः हे ब्रीदवाक्य लक्षात ठेऊन आणखी उत्तम पद्धतीने शेतकरीभिमुख विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करावे असे सांगितले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
https://www.facebook.com/


No comments:
Post a Comment