Saturday, May 10, 2025

मुकुंदवाडी येथे तृणधान्यांचे महत्त्व व मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 





कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर

मुकुंदवाडी येथे तृणधान्यांचे महत्त्व व मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ मार्फत दिनांक ०९ मे,२०२५ रोजी सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ, मुकुंदवाडी येथे भावी उद्योजिका महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांनी अन्नपूर्णा प्रकल्प अंतर्गत असलेले सर्व विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तृणधान्याचे आहारातील महत्त्व, त्यांच्यात असलेले पोषण तत्व, मूल्यवर्धन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, तसेच बाजारपेठ याविषयी प्रात्यक्षिकासह सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र मार्फत घडलेली उद्योजिका सौ.संपदा बालापुरकर यांनी त्यांची यशोगाथा सांगून पोषण युक्त खाद्यपदार्थ तयार करून दाखविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले.



****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :  

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

No comments:

Post a Comment

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...