मा.आ.श्री.विलासबापू भुमरे व मा.आ.श्रीमती.अनुराधाताई चव्हाण यांची केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ०५ मे, २०२५ रोजी पैठणचे आमदार मा.आ.श्री.विलासबापू भुमरे व फुलंब्री च्या आमदार मा.आ.श्रीमती.अनुराधाताई चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी मा.तहसीलदार, मा.सभापती महोदय आदी मान्यवर देखील उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या द्वारे दि.०५ मे, २०१५ रोजी प्रशिक्षण सभागृह, कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत खरीप हंगाम २०२५ नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मा.श्री. प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती, पठारे मॅडम, उपविभागीय कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.शाम गुळवे, तालुका कृषी अधिकारी,छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, प्रमुख, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.लक्ष्मण काळे, कृषी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांनी केव्हीकेत सुरू असलेल्या विविध विस्तार कार्य व उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि केव्हीकेतून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा जास्तीत शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असेल सांगितले. तसेच कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे मार्गदर्शीत प्रगतशील शेतकरी, महिला उद्योजिका यांच्या स्टॉल ला भेटी दिल्या व त्यांच्या कामाचे कौतुक केले. तांत्रिक सत्रामध्ये
मा.डॉ.ज्ञानेश्वर मुटकुळे, कीटक शास्त्रज्ञ, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर यांनी खरीप पिकांतील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी तर डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी खरिपातील हंगामी पिकांची पूर्वतयारी तसेच डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी फळपिकांचे खरीप हंगामातील नियोजन यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जिल्यातील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, महिला उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar



No comments:
Post a Comment