Friday, May 30, 2025

विकसित देशासाठी विकसित कृषि आवश्यक-मा.आ.सौ.अनुराधाताई चव्हाण

 


विकसित देशासाठी विकसित कृषि आवश्यक-मा.आ.सौ.अनुराधाताई चव्हाण


विकसित कृषि संकल्प अभियान-२०२५ ची कुंबेफळ ता.छत्रपती संभाजीनगर येथून सुरुवात

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अटारी,पुणे, कृषी विभाग तथा आत्मा, छत्रपती संभाजीनगर इफको,छत्रपती संभाजीनगर आणि कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ मे २०१५ रोजी मौजे कुंबेफळ ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विकसित कृषि संकल्प अभियान-२०२५ चे उद्घाटन मा.आ.अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री मा.श्री.शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ या दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ राबवण्यात येत आहे. यामध्ये आपल्या देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रे,भारतीय कृषी अनुसंधान परिषद,नवी दिल्ली अंतर्गत असणाऱ्या सर्व संस्था, भारतातील सर्व कृषी विद्यापीठे कृषी विभाग,आत्मा, इफको व इतर संलग्नित विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व विभागांतून उपस्थित असलेले शास्त्रज्ञांची टीम प्रत्येक गावात जाऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण ९० गावांमध्ये कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे याची सुरुवात आणि उद्घाटन समारंभ दि. २९ मे २०२५ रोजी कुंबेफळ ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथून फुलंब्री विधानसभेच्या मा.आ.अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. 

यावेळी कुंबेफळ गावच्या सरपंच मा.श्रीमती कांताताई मुळे, मा.श्री.प्रकाश देशमुख,विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती.अश्विनी पठारे,उपविभागीय कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.रामूकाका शेळके, मा.श्री श्याम गुळवे, तालुका कृषी अधिकारी,छत्रपती संभाजीनगर, मा.श्री. कलिम शेख, जिल्हा व्यवस्थापक, इफको, छत्रपती संभाजीनगर, तसेच आयव्हीआरआय येथील शास्त्रज्ञ मा.डॉ.एस.के.दास, मा.डॉ.अमोल भालेराव तसेच माफसू येथील शास्त्रज्ञ मा.डॉ.नितीन जाधव, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ.अनिता जिंतूरकर,  डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ, श्री.सतिश कदम, श्री.शिवा काजळे, श्री.जयदेव सिंगल, श्री. किशोर शेरे, श्री. विशाल दाभाडे, इतर विभागातील कर्मचारी यांच्यासह गावातील प्रगतशील शेतकरी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. श्रीमती.चव्हाण म्हणाल्या की, देशाच्या विकासामध्ये कृषीचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे देश विकसित करण्यासाठी कृषी विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून केंद्र सरकार मार्फत हा अभिनव उपक्रम पूर्ण देशांमध्ये राबवण्यात येत आहे. विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत केंद्रशासन राज्य शासन मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कृषी यांत्रिकीकरण, पीक लागवड तंत्रज्ञान, विविध पिकांचे प्रात्यक्षिक यांची कार्यक्रम पूर्ण जिल्हाभरात घेण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन या अभियानातील ज्ञानाचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून घ्यावा. तसेच कृषी विभाग व इतर संबंधित विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊन त्या योजनांचा लाभ देखील शेतकरी बांधवांना घेण्याची गरज यावेळी त्यांनी नमूद केली. कृषी विज्ञान केंद्र,पैठण रोड छत्रपती संभाजीनगर मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी घेतली व ही माहिती शेतकरी बांधवांना अत्यंत उपयुक्त असून कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रमांचा वापर आणि फायदा शेतकरी बांधवांनी करून घ्यावा अशी ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विकसित कृषी संकल्प अभियान पूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्राने राबवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय कृषी सहसंचालक मा.श्री.देशमुख म्हणाले की, शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र काढणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासाठी शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे सर्व योजनांचा लाभ हा शेतकरी ओळखपत्रावर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या क्रमांकावर अवलंबून असणार आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी शेतकरी आयडी शेतकरी ओळखपत्र काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच पद्धतीने कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आणि त्याचा लाभ शेतकरी बांधवांना देण्यासाठी कृषी विभाग सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आयव्हीआरआय येथील मा.डॉ.एस.के.दास मा.डॉ.अमोल भालेराव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना आयव्हीआरआयमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती दिली. या सोबतच पशुधन व्यवस्थापन संदर्भात आणि पशुधनाच्या लसीकरण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच माफसू येथून आलेले मा.डॉ.नितीन जाधव यांनी देखील पशुधन व्यवस्थापन दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन तसेच लसीकरण आणि विविध योजना संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी प्रगतशील शेतकरी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री.अनिल शेळके यांनीही त्यांची शेतीतील अनुभव आणि त्यांची यशोगाथा यावर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी बंधावसाठी इफको मार्फत ड्रोनचे प्रात्यक्षिक घेऊन त्याची माहिती देण्यात आली.

दिनांक २९ मे २०२५ रोजी कुंबेफळ येथून उद्घाटन झाल्यानंतर कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड,छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत मौजे भांबर्डा, दुधड, मुरूमखेडा, पिंपळखुंटा आणि लाडसावंगी ता.जि.छत्रपती संभाजीनगर या गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे उपस्थित मान्यवरांच्या मार्फत देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.अनिता जिंतूरकर यांनी केले.


#ViksitKrishi #विकसितकृषि #kvkcsn1 #kvkchhatrapatisambhajinagar1

































****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :  

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...