केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ च्या वतीने विकसित कृषि संकल्प अभियानाचा दुसरा दिवस उत्साहात साजरा
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री माननीय मा.श्री.शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात देशभरात राबविण्यात येत असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान-२०२५ च्या दुसऱ्या दिवशी दिनांक ३०.०५.२०२५ रोजी मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी, मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक, विस्तार शिक्षण, वनामकृवि, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टोणगाव,हिवरा, जडगाव, गारखेडा, पिंपरी राजा आणि आडगाव या गावांमध्ये जाऊन शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये खरीप हंगाम पूर्व नियोजन, पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय उभारणी, फळबाग लागवड तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शासनाच्या विविध योजना, शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, महिला आरोग्य व्यवस्थापन, महिला गृह उद्योग उभारणी, माती परीक्षण व जमीन आरोग्य व्यवस्थापन या आणि अशा विविध विषयावर शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सर्व शास्त्रज्ञांच्या वतीने देण्यात आली. यासोबतच गावातील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्व सहभागीना सांगण्यात आल्या. शेतकरी बांधवांचे प्रत्याभरण घेऊन त्यानुसार शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच शेतकरी बांधवांच्या प्रक्षेत्रावर भेटी देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेऊन शेती संदर्भातील योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर च्या प्रमुख मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ मा.डॉ.अनिता जिंतुरकर,डॉ.बस्वराज पिसुरे, मा.श्री.अशोक निर्वळ, आयव्हीआरआय, पुणे येथील शास्त्रज्ञ मा.डॉ.अमोल भालेराव, मा.डॉ.एस.के. दास तसेच माफसू येथील शास्त्रज्ञ मा.डॉ.नितीन जाधव, सोबतच केव्हीकेचे कर्मचारी श्री.सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.विशाल दाभाडे, श्री.जयदीप बनसोडे, श्री किशोर शेरे यांच्यासह कृषी विभागातील श्रीमती.उकिरडे मॅडम, श्री.शंभूराजे जाधव, यांच्यासह प्रत्येक गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य, महिला बंधू-भगिनी यांचा मोठा सहभाग होता.
#विकसितकृषि #ViksitKrishi #viksitkrishisankalp #kvkcsn1 #kvkchhatrapatisambhajinagar-1
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
https://www.facebook.com/
















No comments:
Post a Comment