मा.डॉ.गिरीधारी वाघमारे, मा.डॉ.तुकाराम मोटे, मा.डॉ.सूर्यकांत पवार आदी मान्यवरांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर च्या स्टॉल ला भेट
शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीकेच्या स्टॉल मोठ्या संख्येने भेट
ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२५
दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला असून या स्टॉलवर विविध कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम, फळबाग लागवड, फुलशेती, कृषी हवामान सल्ला पत्रिका, किसान सारथी, कृषी अभियांत्रिकी, ड्रोनचा शेतीसाठी वापर व इतर विविध विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे.
या स्टॉलला दि.१० जानेवारी,२०२५ रोजी मा.डॉ.गिरीधारी वाघमारे, संचालक, विस्तार शिक्षण,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मा.डॉ.तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर तसेच ॲग्रोवनचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मा.श्री. संतोष मुंडे, प्रगतशील शेतकरी मा.श्री. दीपक जोशी, महाराष्ट्र शासनाचा रेशीमरत्न पुरस्कार विजेते शेतकरी मा.श्री. सदाशिव गीते तसेच इतर मान्यवर आणि प्रगतशील शेतकरी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन सर्व उपक्रमांची माहिती घेतली. हे प्रदर्शन १३ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू असून कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनीं, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी.

No comments:
Post a Comment