मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट
विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीकेच्या स्टॉल मोठ्या संख्येने भेट
ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२५
दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला आहे. या स्टॉलला मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी दि.११ जानेवारी, २०२५ रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी केव्हीकेचे विविध उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे मार्गदर्शित मातोश्री बबाई प्रोड्युसर कंपनी, वाकोद, ता.कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या ड्रोनची पाहणी करून त्याबद्दलची माहिती जाणून घेतली व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत मा.डॉ.गिरीधारी वाघमारे, संचालक, विस्तार शिक्षण,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.किरण जाधव, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, बदनापूर, मा.डॉ.संजय पाटील सोयगावकर, प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर यांच्यासोबत इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या वतीने डॉ.अनिता जिंतूरकर, इंजि. गीता यादव, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ, श्री.जयदेव सिंगल, श्री. जयदीप बनसोडे आदींनी मा.कुलगुरू व सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉलवर विविध कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम, फळबाग लागवड, फुलशेती, कृषी हवामान सल्ला पत्रिका, किसान सारथी, कृषी अभियांत्रिकी, ड्रोनचा शेतीसाठी वापर व इतर विविध विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी केवहिकेच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेटी देऊन माहिती घेत आहेत. हे प्रदर्शन १३ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू असून कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनीं, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी.

No comments:
Post a Comment