मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट
विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीकेच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेट
ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२६
दिनांक ०९ जानेवारी २०२६ पासून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला आहे. या स्टॉलला मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यासह मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वनामकृवि, परभणी, मा.डॉ.सुर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिपक पाटील, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषि महाविद्यालय, बदनापूर तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी मा.श्री.दादासाहेब शिंदे यांनी दि.१० जानेवारी, २०२६ रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी केव्हीकेच्या विविध उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ मार्फत कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर, श्री.विवेक पतंगे, श्रीमती.करुणा शिंदे, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे, श्री.जयदेव सिंगल आदी कर्मचाऱ्यांनी सर्व मान्यवर, शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करून विविध उपक्रम आणि तंत्रज्ञाना बद्दल सविस्तर माहिती दिली.
या प्रदर्शनात छत्रपती संभाजीनगर चे विभागीय कृषि सह संचालक मा.श्री.वानखेडे सर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर च्या प्रकल्प संचालक आत्मा, मा.श्रीमती. धनश्री जाधव आणि कृषि विभागातील विविध पदाधिकाऱ्यांनी तसेच शेतकरी बंधू भगिनी, कृषि उद्योजक, विद्यार्थी यांनी केव्हीकेच्या स्टॉलला दिनांक ०९.०१.२०२६ रोजी भेट दिली होती.
केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉलवर विविध कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये नैसर्गिक शेती, जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम, फळबाग लागवड, फुलशेती, कृषी हवामान सल्ला पत्रिका, किसान सारथी, कृषी अभियांत्रिकी, ड्रोनचा शेतीसाठी वापर व इतर विविध विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी केवहिकेच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेटी देऊन माहिती घेत आहेत. हे प्रदर्शन १२ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू असून कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनीं, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे आवाहन मा.कर्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :










No comments:
Post a Comment