Friday, January 2, 2026

मा.श्रीमती.वर्षा लड्डा-उंटवाल व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट



मा.श्रीमती.वर्षा लड्डा-उंटवाल व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

दिनांक ०२ जानेवारी, २०२६ रोजी मा.श्रीमती. वर्षा लड्डा - उंटवाल, भाप्रसे, महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि मा.डॉ.इन्द्र मणि, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यासह मा.डॉ.किशोर शिंदे,संचालक संशोधन, एमसीएईआर, पुणे, मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वनामकृवि, परभणी यांनी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली.

यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प आणि उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच केव्हीकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखालील कृषि उद्योजकांची माहिती दिली. तसेच यापुढील काळात कृषि विज्ञान केंद्रामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली.

सर्व मान्यवरांनी केव्हीके मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढेही आणखी सक्रियपणे हे उपक्रम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवावेत आणि त्यांचे योग्य सादरीकरण देखील करण्यात यावे, असे सांगितले. 

यावेळी सर्व मान्यवरांनी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे असलेल्या विविध युनिटला भेट देऊन तेथील सर्व उत्पादनांची माहिती घेतली. तसेच कृषि विज्ञान केंद्रात विकसित करण्यात येत असलेल्या एक एकर नैसर्गिक शेतीचे मॉडेल या युनिटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केव्हीके तील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.


****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account


No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...