शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे
मा.डॉ.सुर्यकांत पवार
कृषी दिन व ११२ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न
हवामान बदलानुसार शेती करायची असेल तर जमिनीचे आरोग्य, पाण्याचा संतुलित वापर आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. जमिनीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून यामध्ये सुधारणा करण्यासाठी संतुलीत आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. एकाच पीक पद्धतीचा अवलंब करण्याएवजी नवीन पिकाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. सर्वांना रसायन अवशेषमुक्त अन्न मिळणे देखील गरजेचे आहे. सामाजिक सुरक्षा सोबत अन्न सुरक्षितता येणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढवण्यावर सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी जैविक निविष्ठाचा वापर करणे आवश्यक आहे. सोबतच निरीक्षण आणि सर्वेक्षण करून त्यानुसार संतुलित रसायनांचा वापर करावा. शाश्वत शेतीसाठी रसायन अवशेषमुक्त पीक उत्पादन गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प चे सहयोगी संचालक संशोधन मा.डॉ.सुर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, कृषी विभाग, आत्मा, छत्रपती संभाजीनगर, इफको आणि कृभको, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ०१ जुलै,२०२५ रोजी कृषी दिन व ११२ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ.सुर्यकांत पवार यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक मा.श्री.प्रकाश देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच वनामकृवि, परभणीचे उपसंचालक संशोधन मा.डॉ.हरिहर कौसडीकर हे ऑनलाईन माध्यमाद्वारे सहभागी होते. यासोबतच जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे कृषि विकास अधिकारी मा.श्री. प्रकाश पाटील, सहायक गट विकास अधिकारी मा.श्री.शिवाजी साळुंके, छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्प संचालक आत्मा मा.श्रीमती.धनश्री जाधव, इफको छत्रपती संभाजीनगरचे क्षेत्रीय अधिकारी मा.श्री.कलीम शेख, कृभको छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिकारी मा.श्री.आशिष उमक, केव्हीकेच्या प्रमुख मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राचे मा.श्री.रामेश्वर ठोंबरे रिवूलीसचे प्रतिनिधी मा.श्री.शिवराज लोणाळे, एसएओ कार्यालयाचे तंत्र अधिकारी मा.श्री.एस.आर. चिंतलवार, प्रगतशील शेतकरी मा.श्री.दिपक जोशी, मा.श्री.दत्तू धोतरे, अग्रोवानचे जिल्हा प्रतिनिधी मा.श्री.संतोष मुंढे, सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मा.श्री.सुशेन जाधव, केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर आदीची उपस्थिती होती.
यावेळी मा.श्री.प्रकाश देशमुख म्हणाले कि, शेतकरी बांधवांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यामध्ये सहभागी व्हावे तसेच विद्यापीठामार्फत प्रसार करण्यात येत असलेल्या विविध तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करावा. यावेळी मा.श्री.प्रकाश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कृषि विभाग द्वारे तयार करण्यात आलेल्या खतांची उपलब्धताची माहिती देणारा ब्लॉग बद्दल माहिती दिली व मा.श्री.कलीम शेख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असताना मा.डॉ.हरिहर कौसडीकर म्हणाले कि, जमिनीमध्ये ४५% खनिज पदार्थ असून जमिनीस वापसा स्थिती येण्यासाठी २५% हवा आणि २५% पाण्याची गरज असते. तसेच यासाठी जमिनीमध्ये ५ % सेंद्रिय पदार्थांची आवश्यकता असते. मातीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर यामध्ये गोमूत्र, शेणखत, विविध कंपोस्ट खते, वर्मी कंपोस्ट यांचा नियमित वापर करावा, खत तयार करताना नीट कुजवलेले सेंद्रिय खत वापरणे महत्त्वाचे आहे. याबरोबरच हिरवळीची खते स्वतंत्र किंवा आंतरपिक यामध्ये धेंचा, देशी मूग, तूर यासारखी पिके शेतात पेरून नंतर जमिनीत मिसळल्यास सेंद्रिय कर्ब वाढतो. विविध द्विदल पीकांची फेरपालट, शेतामध्ये शेळ्या मेंढ्या बसविणे, भूसुधारक वापरणे, पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी कुजवून जमिनीत मिसळणे, तेलबियापेंड, घरगुती व शेतीतील जैविक कचऱ्याचा योग्य वापर करून कंपोस्ट तयार करावे. मातीचे आरोग्य राखण्यासाठी जैविक घटकांचा जसे की जिवामृत, घनामृत, जिवाणू रायझोबियम, पीएसबी, अझॅटोवॅक्टर, ट्रायकोडर्माचा वापर आदी उपाय उपयुक्त ठरतात. विशेषतः रसायनांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळल्यास जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब दोन्ही वाढते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धेत उच्च उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी तसेच केव्हीकेद्वारे मार्गदर्शित शेतकरी व महिला उद्योजिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केव्हीकेद्वारे राबण्यात येणारे उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.डॉ.अनिता जिंतूरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनी, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कृषी पदवीचे विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केव्हीकेचे सर्व कर्मचारी व कृषी महाविद्यालय, बदनापूर येथील रावेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
https://www.facebook.com/


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)




No comments:
Post a Comment